Who Hits Most Sixes in International Cricket: सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हंटल की सहाजिकच ख्रिस गेलचं किंवा धोनीचे नाव समोर येतं. पण तुम्हाला हे माहितेय का की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आता अजून एका भारतीय खेळाडूचे नाव जोडले आहे. हा विक्रम ना वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे ना भारताच्या धोनीच्या नावावर आहे. मग आता प्रश्न पडतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर आहेत. तर, हा विश्वविक्रम एका पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या नावावर आहे. या फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून इतके षटकार मारले आहेत की इतर कोणत्याही फलंदाजाला त्याच्या जवळ जाणेही अवघड वाटते. या धाडसी फलंदाजाने 350 हून अधिक षटकार ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी यांच्याकडे आहे. तर आपल्या देशाच्या अर्थात टीम इंडियाचा कर्णधार आणि तुफानी फलंदाज रोहित शर्माच्या नावावर दुसरा क्रमांक आहे. होय, 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मा खऱ्या अर्थाने हिटमॅन झाला आहे. त्याने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ३३२ षटकार ठोकले आहेत. 37 वर्षीय रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो अजूनही एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे.
हे ही वाचा: शोएब अख्तर-हरभजन सिंग एकमेकांना भिडले, भारत-पाक सामन्यापूर्वी 'ग्रेटेस्ट रिव्हलरी'चा Video Viral
सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत शाहिद आफ्रिदी पहिल्या, दुसऱ्या नंबरवर रोहित शर्मा तर अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर ख्रिस गेल आहे.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 332 षटकारांचा आकडा गाठला आहे. त्याने स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या 331 षटकारांना मागे टाकत विश्वविक्रम रचला आहे.
हे ही वाचा: IND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral
हे ही वाचा: Video: गिलच्या गरुडासारख्या नजरेतून चेंडू सुटू शकला नाही, 'सुपरमॅन' बनून घेतला झेल
Rohit Sharma led from the front with an outstanding in the chase & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat England in Cuttack!
Scorecard https://t.co/NReW1eEQtF#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UIUHEtfSfb
— BCCI (@BCCI) February 9, 2025
रोहित शर्माची फलंदाजीची शैलीच अशी आहे की त्याच्यासमोर चांगल्या गोलंदाजांचीही अवस्था बिकट होते. जरी रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये तितका आक्रमक दिसत नसला तरी एकदिवसीय आणि T20 मध्ये त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने महान गोलंदाजांमध्ये एक वर्ग निर्माण केला आहे.