Maharashtra Weather News : छत्री वापरा पण, पावसासाठी नव्हे तर उन्हासाठी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट?

Maharashtra Weather News : आता छत्रीचं ओझंही सोबत बाळगावं लागणार. राज्यातील शहरी भागांसह ग्रामीण क्षेत्रांपर्यंत उन्हाचा वाढता तडाखा अडचणी वाढवणार.   

सायली पाटील | Updated: Feb 11, 2025, 08:09 AM IST
Maharashtra Weather News : छत्री वापरा पण, पावसासाठी नव्हे तर उन्हासाठी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट? title=
Maharashtra Weather news heatwave to strike in mumbai and konkan know nationwide climate updates

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांच्या तापमानाचा आढावा घ्यायचा झाल्यास हा आकडा आता 35 अंश सेल्सिअस हा आकडा ओलांडताना दिसत आहे. लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण म्हणून जरी ओळखलं जात असलं तरीही या ठिकाणीसुद्धा दिवसा तापमान 37.6 अंशांवर पोहोचल्यामुळं आता हवामानातील दाहकता नेमकी कोणत्या मार्गानं चालली आहे हीच बाब लक्षात येत आहे. 

हवामानानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी X च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान 37 अंशांपलिकडे पोहोचलं होतं. राज्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच ही पिस्थिती असल्यामुळं आता प्रत्यक्षात उन्हाळा सुरु झाल्यानंतर नेमकं कसं चित्र असेल हाच प्रश्न चिंतेत भर टाकत आहे. 

सध्या राजस्थानच्या नैऋत्य क्षेत्रासह नजीकच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उत्तर भारतामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. राज्यावर या परिस्थितीचा परिणाम दिसत असून, कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत. राज्याच्या कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्ये सध्या दमट वातावरणात वाढ झाली असून, उष्मा अधिक जाणवण्यास सुरुवात झाली आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सकाळचा गारठा वगळता दुपारी तापमानात मोठ्या संख्येनं वाढ होणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिला. 

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून मुंबईच्या हवेचा खालावलेला दर्जा 

आता वाढत्या उन्हामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे धीम्या गतीनं सुधारताना दिसत आहे. ज्यामुळं मागील काही दिवसांपासून मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; मेसमधील जेवणात पनीर, मंच्युरिअन खाल्लं आणि... 

इथं मध्य भारतासह महाराष्ट्रात उन्हाता तडाखा वाढतच असताना तिथं उत्तर भारतातही कडाक्याची थंडी असतानाच दुपारच्या वेळी तापमानाच काहीशी वाढ होऊन लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. पूर्वोत्तर भारतामध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता असून, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 12 फेब्रुवारी पर्यंत काश्मीरच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज असून जानेवारीच्या तुलनेत इथंही फेब्रुवारीच्या उर्वरित दिवसांमध्ये तापमानात मोठ्या फरकानं वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.