World’s longest car Record breaking Limousine Car : Rolls-Royce, Mercedes-Benz, Audi, BMW, Ferrari, Bugatti Centodieci अशा अनेक luxurious कार जगभर जगप्रसिद्ध कार आहे. या सर्व कारना 'लिमोझिन' ही कार टक्कर देते. 'लिमोझिन' (Limousine)ही जगातील सर्वात लांब कार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कारची नोंद झाली आहे. या कारमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स यासह असे अनेक अविश्वसनीय फिचर्स मिळतात. जाणून घेऊया या अनोख्या कार विषयी.
जगातील सर्वात लांब कारचा रेकॉर्ड लिमोझिनच्या नावे आहे. आजपर्यंत कोणीही या कारचा रेकॉर्ड मोडू शकलेले नीाही. जगातील या सर्वात लांब कारला 26 चाके आहेत. ही कार 30.54 मीटर म्हणेच 100 फूट लांब आहे. सुपर लिमोची रचना 1986 मध्ये कार कस्टमायझर जे ओहरबर्ग यांनी केली होती. तेव्हा या कारची लांबी 60 फूट इतकी होती. त्यानंतर या कारची लांबी 60 वरून 100 फूट करण्यात आली आहे.
या कारचे फिचर्स पाहून लोक थक्क होतात. ही कार म्हणजे चालता फिरता राजवाडाच म्हणावी लागेल. या कारमध्ये वॉटरबेड, मिनी-गोल्फ कोर्स, हेलिपॅड आणि टीव्ही, फ्रिज यासह अनेक सुविधा आहेत. या कारवर हेलिपॅड देखील आहे. 5 हजार पौंडांपर्यंतचे वजन क्षमतेचे हे हेलिपॅड आहे. यामुळेच ही जगातील सर्वात शक्तिशाली कार म्हणूनही ओळखली जाते. याला अमेरिकन ड्रीम असेही म्हणतात.
या कारमध्ये डायव्हिंग बोर्ड असलेला स्विमिंग पूल, जकूझी आणि बाथटब, एक मिनी-गोल्फ कोर्स तसेच एक किंग-साईज वॉटरबेड देखील आहे. या कारमध्ये दोन V8 इंजिन आहेत. याचे एक इंजिन पुढे आणि दुसरे इंजिन मागे आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे ही कार ट्रेनसारखी दोन्ही बाजूंनी चालवता येते. फ्लोरिडामधील ऑर्लडो येथील डीअरलँड पार्क ऑटो संग्रहालयात ही कार ठेवण्यात आली आहे.