नवी दिल्ली : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्याला पाच जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यापूर्वी टीम इंडिया आफ्रिकेत एकही सराव सामना खेळणार नाही.
या दौऱ्याच्या तयारीसाठी बीसीसीआय टीम इंडियाबरोबर चार युवा फास्ट बॉलर्सना पाठवणार आहे. मोहम्मद सिराज, आवेश खान, नवदीप सयानी आणि बासिल थाम्पी अशी या चार फास्ट बॉलर्सची नावं आहेत.
हे चार बॉलर्स भारतीय बॅट्समनना दक्षिण आफ्रिकेत नेटमध्ये बॉलिंग करणार आहेत. आफ्रिकेच्या तेज तर्रार पिचवर टीम इंडियाची कसोटी लागणार आहे. आणि त्यासाठीच बीसीसीआयनं या चार फास्ट बॉलर्सना टीमबरोबर दक्षिण आफ्रिकेला पाठवण्याचा निर्णय घेतलाय.