Sachin Tendulkar : टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर आणि 'गॉड ऑफ क्रिकेट' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) बीसीसीआयच्या वार्षिक समारोहामध्ये भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतासाठी 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या 51 वर्षीय सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. बोर्डाच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की सचिनला वर्ष 2024 साठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
सचिन तेंडुलकरपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच रवी शास्त्री आणि माजी विकेटकिपर फारुख इंजिनीयर यांना 2023 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेंडुलकरने याच्या कारकिर्दीत खेळण्यात आलेल्या 200 टेस्ट आणि 463 वनडे सामने खेळून क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक केल्या आहेत. त्याने वनडेत 18,426 धावा शिवाय टेस्टमध्ये 15,921 धावा केल्या. सचिनने आपल्या करिअरमध्ये केवळ 1 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 1989 मध्ये सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्याने पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. तसेच सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक करण्याचा विक्रम आहे.
हेही वाचा : Video : विराट निघाला फुसका बार! युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर झाला क्लीन बोल्ड, स्टंप हवेत उडाले
BCCI ने हा पुरस्कार 1994 मध्ये क्रिकेट संघाचे पहिला कर्णधार कर्नल सीके नायडू यांच्या सन्मानार्थ सुरू केला होता. नायडू यांची 1916 ते 1963 अशी 47 वर्षांची प्रथम श्रेणी कारकीर्द होती. हा एक जागतिक विक्रम आहे. नायडू यांनी क्रीडा प्रशासक म्हणूनही काम केले. सचिन तेंडुलकर हा बीसीसीआयकडून दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचा 31 वा मानकरी आहे. सचिनला हा पुरस्कार शनिवारी बीसीसीआयच्या वार्षिक समारोह सोहळ्या दरम्यान दिला जाईल अशी माहिती मिळत आहे.