आकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...'

आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलीय.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 7, 2025, 08:16 PM IST
आकाची नार्को टेस्ट करा, आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब, 'तुरुंगात असतानाही...' title=

भाजप आमदार सुरेश धस यांनी आता नार्को टेस्टचा नवा बॉम्ब टाकलाय. आकाची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. आका तुरुंगात असतानाही त्यांच्या गँगची दहशत कायम असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस सातत्यानं आवाज उठवताहेत. आता थेट आकाची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुरेश धस यांनी केलीय. अशोक मोहिते यांच्यावर हल्ला करणारे कृष्णा आंधळेचे साथीदार आहेत, असा दावाही सुरेश धस यांनी केलाय. वाल्मिक कराड गजाआड आहे, पण आकाच्या गँगचा माज संपलेला नाही, असंही देखील सुरेश धस यांनी म्हटलंय.

आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मात्र कृष्णा आंधळेच्या सहकाऱ्यांनी अशोक मोहिते यांना मारहाण केली. याप्रकरणी आरोपी वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली. बीडच्या धारूर पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपींना अटक केलीय.

आधीच फरार असलेल्या कृष्णा आंधळेची सहकारी अजूनही दहशत पसरवण्याची हिंमत कशी करताहेत, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. आता धस यांनी वाल्मिकच्या नार्को टेस्टची मागणी करून याप्रकरणात नवा बॉम्ब टाकलाय. नार्को टेस्ट होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचंय.

दोन महीने उलटले तरी कृष्णा आंधळे फरारारच

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे दोन महिने उलटले तरी अद्याप फरारच आहे. अशोक मोहितेवर हल्ला करणारे ही याच टोळीचे सहकारी असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.