Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सामन्यांना सुरुवात होणार आहे. पर्थमध्ये पहिल्या टेस्ट सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे, ही सिरीज भारताला WTC फायनलच तिकीट मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरणार असल्याने याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय. यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) टीम इंडियात (Team India) अनेक बदल करण्यात आले असून नव्या खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात आली आहे. भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र टेस्ट सीरिजपूर्वी त्याला अचानक मिळाली मोठी जबाबदारी मिळाली आहे.
चेतेश्वर पुजारा हा यापूर्वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात महत्वाचा खेळाडू राहिलेला आहे. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नेहमी अडचणीत टाकलंय. मात्र यंदा पुजारा हा टीम इंडियाचा भाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी जोडला गेला आहे. पुजारा सीरिजदरम्यान स्टार स्पोर्ट्ससाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री करताना दिसू शकतो.
शुभमन गिलला पुजाराच्या जागी टीम इंडियात सामील केलं गेलं आहे. परंतु दुखापतीच्या कारणामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर पडलाय. त्यामुळे देवदत्त पडिक्कल याला पर्थ टेस्टमध्ये गिलच्या जागी संधी मिळू शकते. पडिक्कलला अद्याप मुख्य संघामध्ये सामील करण्यात आले नसले तरी ती इंडिया ए संघाचा भाग होता आणि आता त्याला थांबण्यात आले आहे. त्यामुळे पडिक्कल याला पर्थ टेस्टमध्ये संधी मिळू शकते अशी शक्यता आहे.
36 वर्षांच्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त प्रदर्शन केलंय. 2018-19 सीरिजमध्ये त्याने 7 इनिंगमध्ये 521 धावा केल्या होत्या. यात तीन शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. या खेळीची त्याला प्लेअर ऑफ द सिरीजच अवॉर्ड मिळाला होता. ऑस्ट्रेलियामध्ये त्याची सरासरी 47.28 ची आहे. त्याने 11 सामन्यात 993 धावा केल्या आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज ही वर्ष 1991-92 नंतर होत आहे.
हेही वाचा : आयपीएल टीमच्या मालकांमध्ये कोण आहे सर्वात गरीब? कोणाकडे किती संपत्ती?
रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी