'महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही, तर....', नाणीजचे नरेंद्र स्वामी यांचं मोठं विधान

नाणीजचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाहीतर साधू-संतामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2025, 09:16 PM IST
'महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही, तर....', नाणीजचे नरेंद्र स्वामी यांचं मोठं विधान

नाणीजचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाहीतर साधू-संतामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या दाव्याला भाजप नेते दरेकरांनी देखील दुजोरा दिला आहे. 

महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा केला. मात्र, महायुतीच्या या नेत्यांचा दावा नरेंद्र स्वामींनी फेटाळून लावला आहे... महायुतीला लाडक्या बहिणींमुळे नव्हे तर साधू-संत आणि संघामुळे विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

नरेंद्र स्वामींनी केलेल्या दाव्याला भाजप नेत्यांनी देखील दुजोरा दिला आहे. साधू-संताचा महायुतीच्या विजयात हातभार असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे. तसंच लाडक्या बहिणींचाही मोठा वाटा होता असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू-संतामुळे महायुतीचा विजय झाल्याचं विधान केल्यानंतर नरेंद्र स्वामी चांगलेच चर्चेत आले आहेत. तसंच नरेंद्र स्वामींनी यावेळी एकनाथ शिंदे आणि दादांना देखील टोला लगावला होता.

40 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार?

लाडकी बहीण योजनेतून 40 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. सरकारनं वेगवेगळ्या पातळ्य़ांवर योजनेतील महिलांची पडताळणी सुरु केली आहे. या पडताळणीत निकषात न बसणा-या महिलांना योजनेचा लाभ देता येणार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी कुणी वगळण्याची वाट न पाहता योजनेतून बाहेर व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 

लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरु झाली आबे. आतापर्यंत 12 लाख लाभार्थी महिलांना योजनेबाहेर करण्यात आलं आहे. पुढच्या काळात हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'झी २४ तास'ला सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काळात अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या 40 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. 40 लाख महिला लाभार्थ्यांना पुढच्या काळात योजनेतून बाहेर काढलं जाण्याच्या शक्यतेनं सामान्य लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. ही योजना गरजू आणि आदिवासी महिलांसाठी आहे. त्यामुळे सरकारनं नावं वगळण्याच्या आधीच स्वतः महिलांनी योजनेतून बाहेर व्हावं असं आवाहनही सरकारनं केलं आहे. 

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अडीच कोटींवर आहे. अडीच कोटींपैकी पडताळणीत 10 लाख लाभार्थी वगळले गेले तर गैर काय असा सवाल सरकारकडून विचारला जात आहे. 

सरकारी पातळीवर आणखी एक दावा केला जातोय. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानुसार अनेक महिला स्वतःहून योजनेबाहेर होत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे. 

सुरुवातीला या योजनेची पडताळणी छाननी होणार नाही असं सरकार सांगत होतं. आता मात्र 20 ते 40 लाख लाभार्थ्यांना योजनेबाहेर करण्याची तयारी सरकारनं केली आहे. पुढच्या काळात ही संख्या वाढणार त नाही ना या धास्तीनं लाभार्थी महिलांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.