BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.  

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 18, 2024, 10:28 AM IST
BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का! title=

Border Gavaskar Trophy Controversy: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेर क्रिकेटशिवाय अनेक वादात अडकला आहे. विराट कोहलीच्या आक्रमक वागणूकेचे तर अनेक प्रसंग आहेत. त्याच्या या अशा वागण्यामुळे एकदा एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला विराट कोहलीला स्टंपने मारायचे होते. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला का मारायचे होते कोहलीला? 

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर एड कोवेनने फॉक्स स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत हा जुना किस्सा सांगितलं आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या भारत दौऱ्यात एड कोवेन आणि विराट कोहली यांच्यात मारामारी झाली होती. एड कोवेनच्या म्हणण्यानुसार, कोहलीने त्याला काही अत्यंत अयोग्य शब्द बोलले होते, ज्यासाठी त्यावेळी विराटला स्टंपने मारायचे होते. 

हे ही वाचा: यंदा IPL 2025 Auction मध्ये लागणार फक्त 13 वर्षांच्या खेळाडूवर बोली, तर कोण आहे सर्वात वयस्कर खेळाडू

कोहलीचे वर्तन होते अतिशय अयोग्य 

मुलाखतीदरम्यान एड कोवेन म्हणाला की, 'त्या मालिकेदरम्यान माझी आई खूप आजारी होती आणि तेव्हाच कोहलीने असे काही बोलले जे खूप अयोग्य होते. त्याने एक वैयक्तिक बाब जी अत्यंत संवेदनशील होती तीच बोलून दाखवली.त्यावेळी कोहलीला पटकन कळले नाही की त्याने सीमा ओलांडली आहे. जोपर्यंत अंपायर येऊन त्याला म्हणला की,' विराट तू सीमा ओलांडली आहेस.'  असे म्हटल्यावर त्याने माफी मागितली.ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर एड कोवेन म्हणाला, 'एक क्षण असा आला जेव्हा मला स्टंप उपटून त्याला ठार मारायचे होते. मात्र, आपण भारतीय कर्णधाराचा मोठा चाहता असल्याचेही कोवनने सांगितले. मी त्याच्या क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. मला चुकीचे समजू नका, तो एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे.'

हे ही वाचा: सचिन तेंडुलकरला पाकिस्तानसाठी का करावी लागली होती फिल्डींग?

 

विराट कोहलीचे रेकॉर्ड

विराट कोहलीने भारतासाठी 118 कसोटी सामन्यांमध्ये 47.83 च्या सरासरीने 9040 धावा केल्या आहेत ज्यात 29 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 धावा होती. 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने 58.18 च्या सरासरीने 13906 धावा केल्या आहेत ज्यात 50 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या १८३ धावा होती. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२२ धावा होती. विराट कोहलीच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 विकेट आहेत आणि 13 धावांत 1 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.