Border Gavaskar Trophy : भारतीय संघाचा टेस्ट क्रिकेटमधील परफॉर्मन्स दिवसेंदिवस ढासळत असल्याने सध्या टीम इंडियाचे खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक इत्यादींवर टीका केली जात आहे. बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकल्यावर टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमध्ये क्लीन स्वीप मिळाला तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजमध्ये सुद्धा एडिलेड आणि मेलबर्न टेस्टमध्ये पराभूत होऊन टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. दरम्यान मेलबर्नमध्ये टेस्टमध्ये मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीर याने ड्रेसींग रूममध्ये जाऊन खेळाडूंना झापलं. एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आले आहे.
एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गौतम गंभीरने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी माजी प्रशिक्षक राहुल द्रविड प्रमाणे चेतेश्वर पुजाराला घेण्याची शिफारस केली होती. गंभीरला वाटत होतं की, 100 टेस्ट खेळलेल्या पुजाराचा अनुभव टीम इंडियासाठी कामी यावा. मागे ऑस्ट्रेलिया मिळवलेल्या दोन सामन्यांच्या विजयाचा शिल्पकार हा पुजारा होता. त्याने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविरुद्ध मोठ्या धावा केल्या होत्या. तसेच पुजारा हा रोहित शर्मापेक्षा वयाने कमी आहे.
हेही वाचा : हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं
Gautam Gambhir wanted Cheteshwar Pujara for the BGT, but selectors turned it down. (Express Sports). pic.twitter.com/oAMdkDsJ8N
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) January 1, 2025
रिपोर्टमध्ये इंडियन एक्सप्रेसने दावा केला आहे की, गौतम गंभीरला कोणत्याही परिस्थितीत पुजाराला संघात घ्यायचे होते. परंतु त्याला टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीने नकार दिला. सिलेक्शन कमिटीचे चीफ अजित आगरकर असून संघाचं सिलेक्शन करण्यात रोहित शर्माचा सुद्धा महत्वपूर्ण सहभाग असतो. चेतेश्वर पुजाराच्या शिवाय टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. सध्या टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे मैदानात जास्त धावा करण्यास अपयशी ठरतायत.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ टेस्टमध्ये विजय मिळवला. रोहित शर्मा त्यावेळी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी भारतात आपल्या कुटुंबासोबत होता. त्यावेळी देखील गौतम गंभीरने चेतेश्वर पुजाराला टीम इंडियामध्ये सामील करण्याबाबत निवडकर्त्यांशी चर्चा केली, परंतु त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागील टेस्ट सीरिजच्या विजयाचा हिरो चेतेश्वर पुजारा सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सिरीजची कॉमेंट्री करत आहे.