हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 1, 2025, 12:58 PM IST
हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS Test :  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात सध्या 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून मंगळवारी मेलबर्नमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा तब्बल 184 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियावर खूप दबाव असून बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकल्यापासून भारतीय संघाचं टेस्ट क्रिकेटमध्ये चांगलं परफॉर्म केलेलं नाही. न्यूझीलंड विरुद्ध तीन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमध्ये देखील भारताला क्लीन स्वीप मिळालं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे. 

टीम इंडियाला मिळत असलेल्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगलंच तापलं असून अनेक वरिष्ठ खेळाडूंवर प्रश्न विचारले जात आहेत. तर काही जुनिअर खेळाडूंच्या बेजबाबदारपणामुळे मॅनेजमेंट वैतागली आहे. मेलबर्नमध्ये मिळालेल्या पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीरचा संताप अनावर झाला आणि त्याने ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना झापलं. 

ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना गंभीरने झापलं : 

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, गंभीर मेलबर्नमध्ये झालेल्या पराभवानंतर खूप नाराज झाले होते. त्यांनी खेळाडूंना टीम मिटिंगमध्ये म्हटले की, "आता खूप झालं". गंभीरने बोलताना कोणत्याही एका खेळाडूचं नावं घेतले नाही, मात्र त्याचा रोख हा सर्व खेळाडूंकडे होता. 9 जुलै रोजी भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्याने या टीम मीटिंगमध्ये सांगितले की, गेल्या 6 महिन्यात टीम इंडियातील खेळाडूंना मी त्यांच्या मर्जीनुसार खेळू दिले, पण यापुढे संघ कसा खेळणार हे तोच ठरवेल. 

हेही वाचा : 'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी

हेड कोच गौतम गंभीरकडून टीम इंडियातील नियमांचे पालन करण्याचा इशारा खेळाडूंना दिला आहे. गंभीने इशारा देताना टीम इंडियाला म्हटले की, भविष्यात जे त्याचा प्लॅन फॉलो करणार नाही  त्याला 'धन्यवाद' देऊन बाहेर काढले जाईल. सध्याच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत संघ 1-2 ने पिछाडीवर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होणं अवघड आहे. 

गंभीर हेड कोच असल्यापासून इंडियाचे प्रदर्शन : 

टेस्ट : 

बांग्लादेश विरुद्ध भारताला 2 सामान्यांच्या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली सिरीज. 

न्यूझीलंड विरुद्ध भारताला 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये 0-3 ने पराभव. 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये  0-3 ने पराभव. 

वनडे : 

श्रीलंके विरुद्ध 3 सामान्यांच्या सीरिजमध्ये 0-2 ने पराभव

टी20 आंतरराष्ट्रीय : 

श्रीलंके विरुद्ध 3 सामन्यांची सीरिज 3-0  ने जिंकली. 

बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची सीरिज 3-0  ने जिंकली.