Govinda's Wife Sunita : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी चर्चेत असते. अनेकदा सुनीता ही गोविंदाला ट्रोल करताना दिसते. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पॉडकास्टमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यात त्यांनी म्हटलं की गोविंदा उशिरापर्यंत जागतो आणि त्याची स्लीप सायकल ही खराब करतो. इतकंच नाही तर सुनीता हे देखील म्हणाली की गोविंदाला मूर्ख लोकं खूप आवडतात.
सुनीतानं ही मुलाखत कर्ली टेल्सला दिली होती. त्यावेळी तिनं सांगितलं की गोविंदा हा दिवस-रात्र काम करताना दिसतो. त्याची झोपेची सायकलच खराब झाली आहे. सुनीता बोली, 'तो रात्र 2:30 वाजता झोपतो. ही त्याची नेहमीची सवय झाली आहे कारण तो दिवल-रात्र काम करत राहतो आणि आता त्याला या सगळ्याची सवय झाली आहे.'
सुनीतानं सांगितलं की तो गोविंदा पेक्षा पूर्ण वेगळं आहे. ती म्हणाली, 'मला कमी बोलायला आवडतं कारण मला मूर्ख लोकांवर माझी एनर्जी वाया घालायला नाही आवडतं. पण गोविंदाला मूर्ख लोक खूप आवडतात. तो चार मूर्ख लोकांसोबत बसेल आणि मग लोकं मुर्खांसारख्या गप्पा मारतील. मला ते आवडत नाही. मला माझी एनर्जी मेडिटेसन आणि प्रार्थनामध्ये घालवायला आवडतं.'
सुनीता तिच्या मद्यपानाची शौकवर बोलताना दिसली. त्यावेळी तिनं एक मुलाखतीत सांगितलं की ती हिंदू आहे पण ख्रिश्चन झाली कारण तिला मद्यपान करायला आवडतं. काही खास कारण असेल किंवा दिवस असेल तर ती खूप मद्यपान करते. तिनं तिच्या मुलाच्या लॉन्चच्या वेळी खूप मद्यपान केलं होतं. सुनीता 12 वर्षांपासून स्वत: चा वाढदिवस एकटयानं साजरा करते. रात्रीचे 8 वाजले की ती खूप मद्यपान करते.
हेही वाचा : 'तारे जमीं पर'मध्ये दिसला असता अक्षय खन्ना; Aamir Khan ने कसा हिसकावला सिनेमा
ही पहिल्यांदा वेळ नाही तर या आधी देखील गोविंदाची पत्नी सुनीता तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. तिचं चर्चेत येण्याचं कारण हे तिचं स्पष्ट वक्तव्य आहे.