Eknath Gaikwad Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते

Updated: Apr 28, 2021, 11:49 AM IST
Eknath Gaikwad Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन  title=

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे करोनामुळं निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Former MP Eknath Gaikwad Passes away due to Corona ) मात्र, आज सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे एकनाथ गायकवाड हे वडिल. एकनाथ गायकवाड यांच्यासोबत त्यांचे जावई देखील कोरोनाबाधित झाले होते. मात्र त्यांनी उपचारा साथ देत कोरोनावर मात केली आहे. एकनाथ गायकवाड यांची देखील प्रकृती सुधारत होती. मात्र त्याचवेळी त्यांचा जुना त्रास डोकं वर करू लागला. एकनाथ गायकवाड यांना किडनीचा त्रास होता. कोरोनातून ते बरे होत असतानाच त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला आणि किडनीचा आजार बळावला. त्यांना अगोदरपासूनच किडनीचा आजार होता.

गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २० दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी १० वाजता त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडिल होते.