दिल्लीच्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये कुणी? का आणि कधी बांधली?

Aurangzeb : औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्राच्या राजाकारणात नेहमीच वाद विवाद होत असतात. मात्र, औरंगजेब  चर्चेत आला आहे तो छावा चित्रपटामुळे. जाणून घेऊया औरंजेबचा शेवट महाराष्ट्रात कसा झाला.   

वनिता कांबळे | Updated: Feb 17, 2025, 11:19 PM IST
दिल्लीच्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये कुणी? का आणि कधी बांधली?

Aurangzeb Tomb In Maharashtra Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द रुपाने रूपेरी पडद्यावर दाखवणारा छावा (Chhava) चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा, धैर्य, पराक्रम, असमान्य शौर्य,  धर्माभिमान, व्यासंगी असलेल्या संभाजी महाराजांनी अनेक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवलं हाच इतिहास छावा चित्रपटात दाखवण्यात आला आहे. छावा चित्रपटामुळे इतिहासाला उजाळा मिळाला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब. दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये कुणी? का आणि कधी बांधली? जाणून घेऊया इतिहास. 

मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब याने भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्षं राज्य केलं.  3 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये औरंगजेब याचा जन्म झाला. शाहजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुलगा.  ‘अबुल मुझफ्फर मुई-उद-दिन मुहंमद’ असे त्याचे संपूर्ण नाव आहे. 

आग्रा येथे झालेली छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट, कपटी औरंगजेबाने त्यांना केलेली नजरकैद,  मोठ्या शिताफीने औरंगजेबच्या नजरकैदेतून निसटून स्वराज्यात परत आलेले शिवाजी महाराज...हा इतिहास सर्वांनच नाहिती आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच मराठा साम्राज्य जिंकू अशा अविर्भावात औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्रात आला.  

14 कोटींचा खजिना, 4 लाख सैन अशी मोठी फौज घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला. दौलताबादचे नाव बदलून त्याने औरंगाबाद असे केले. मात्र, छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कडवट विरोध केला. मराठ्यांचं स्वराज्य हिसकावण्यासाठी ज्या इर्षेनं औरंगजेब महाराष्ट्राच्या भूमीत आला ती ईर्षा महाराजांनी कधीच पूर्ण होऊ दिली नाही. औरंगजेबाची उभी हयात मराठ्यांविरोधात लढण्यात गेली. स्वराज्याच्या अस्तित्वासाठी मराठ्यांनी एकजुटीनं औरंगजेबाला झुंजवलं. इतकच नाही तर त्याची कबरही याच मातीत गाडली. 

जुलमी मुघल शासक अशी ओळख असलेल्या औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. औरंगाबादजवळ खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे.  

औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणे एवढ्याच खर्चात बनवायची असं सांगितलं होतं. आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखीस लिहीले होते.  3 मार्च 1707 रोजी मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्याच इच्छेनुसार सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधली.  लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे.  औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची अख्यायिका आहे. याच दर्ग्यामध्ये हैदराबादच्या निजामासह इतर काही मुघल राज्यकर्त्यांच्याही कबरी आहेत. 

हे देखील वाचा... 'छावा' चित्रपटाचे बजेट 130 कोटी पण डायलॉग लिहिणाऱ्याने एक पैसाही घेतला नाही; कारण वाचून थक्क व्हाल

हे देखील वाचा... छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती