Solapur: चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच, अशात या चुलीवरच्या भाकरीचा विषयच हार्ड..हीच परंपरा जपणयाचा प्रयत्न करत सोलापुरात चक्क भरलीय भाकरी बनवण्याची स्पर्धा रंगलीय.
आतापर्यंत आपण निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धा ऐकल असाल पण सोलापुरात चक्क भाकरी बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. भारतात प्रथमच ही स्पर्धा भरवण्यात आली असून, बरेच दिवस टिकणाऱ्या या भाकरीबद्दल सर्वांनाच कुतुहूल असतं. चुलीवरच्या जेवणाची चव काही वेगळीच, हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या या युगात चुलिचा विसर पडत चालंलाय. अशात ही पारंपारिक पद्धत जपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि त्यांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे या उद्देशाने ड्रीम फाउंडेशनच्यावतीने ही स्पर्धा भरवण्यात आलीय.
अशा अनोख्या पद्धतीची स्पर्धा यापूर्वी केव्हाच पाहिली नसून, फक्त पाहायला आलं तरी स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा होत असल्याची प्रतिक्रीया तरूणींनी दिलीय. या भाकरी स्पर्धा राज्य स्तरावर झाल्या पाहिजेत अशी भावना स्पर्धकांनी व्यक्त केलीय.
ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असताना त्याला भविष्यात सोलापूरच्या भाकरीला ओळख मिळावी अशी संकल्पना ठेवून, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात आलाय. यासाठी ही राज्यस्तरीय भाकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेमध्ये ही भाकरी प्रसादामध्ये देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या जगात या स्पर्धक महिला चुलीवरच्या भाकरी बनवण्यासाठी अक्षरशः तुटून पडल्या आहेत.