वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच वातावरणात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतातील हवामान बदलू लागले आहे. दिवसा कडक उन्ह आणि पहाटे आणि रात्री गारवा वातावरणात जाणवतो. फेब्रुवारी महिन्यातच अगदी एप्रिल मे प्रमाणे कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
मध्य महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. दिवसा गारवा आणि दुपारी कडक उन्ह असं सध्याच वातावरण आहे. नंदुरबारमध्ये कमाल तापमानाने 40 अंश आहे. पुण्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत गेला. साताऱ्यात कराडमध्ये तापमान 40 अंश झाले होते. बहुतांश ठिकाणी साधारण कमाल तापमान असेच होते.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्तर भारतात धुक्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. त्यानंतर वातावरण स्वच्छ होऊ लागले. आकाश स्वच्छ असल्याने सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येत आहे. एवढ्या कडक सूर्यप्रकाशामुळे हवेतील आर्द्रताही कमी झाली आहे त्यामुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. आणि उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
15 Feb, Tmax 34+ in Maharashtra
Parbhani 36
Satara 35.2
Thane 36.2
Chikalthana 35.4
Kolhapur 35.2
Nashik 34.9
Slp 37.8
Jeur 34
Pune 35.5
Baramati 34.4
Sangli 36.8
Mumbai Scz 36.1
Udgir 34
Dharashiv 34.2
Jalgaon 34
Ahilya nagar 35
:IMD data pic.twitter.com/qvTU9hFZtB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 15, 2025
होळीच्या सणानंतर तापमानात वाढ होते पण यावेळी फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा तडाखा वाढला आहे. चक्रीवादळाचा धोका देखील वाढला आहे. उत्तरेतही वातावरण बदल असून तसेच दक्षिण भारतातून कोरड्या वाऱ्यामुळे हवामानात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख के. एस होसाळीकर यांनी मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा अधिक असल्याचे सांगितले. त्यांनी X माध्यमावरही त्यांनी पोस्ट करत कुठे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली हे सांगितले आहे.