मोदी-शहा नव्हे, 'या' चाणक्यने भाजपला हरियाणात जिंकवलं! अवघ्या 20 दिवसात पलटवली बाजी

Haryana Vidhan Sabha Election Result: भाजपने ही निवडणूक कशी जिंकली? यामागे कोण चाणाक्य होता? त्याने काय रणनीती आखली? जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2024, 05:54 PM IST
मोदी-शहा नव्हे, 'या' चाणक्यने भाजपला हरियाणात जिंकवलं! अवघ्या 20 दिवसात पलटवली बाजी title=
भाजपचा हरियाणा विजयातील चाणाक्य

Haryana Vidhan Sabha Election Result: हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले. यानंतर अनेक राजकीय जाणकारांना धक्का बसला. या राज्यात काँग्रेस बाजी मारेल आणि भाजपची पिछेहाट होईल असे एक्झिट पोल सांगत होते. पण आलेला निकाल हा एक्झिट पोलच्या विरुद्ध होता. हरियाणातील  जनतेने गेल्या 10 वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला पुन्हा सरकारमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. हरियाणा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण देशाला चकित केले.मतदानानंतर सर्व एक्झिट पोल काँग्रेसला प्रचंड बहुमताने जिंकल्याचे दाखवत असतानाच या निकालाने पुन्हा भाजपच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या. या विजयानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दाखवून दिले आहे. पण भाजपने ही निवडणूक कशी जिंकली? यामागे कोण चाणाक्य होता? त्याने काय रणनीती आखली? जाणून घेऊया. 

भाजपने हरलेली बाजी कशी पलटवली?

हरियाणात काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी वातावरण काँग्रेसच्या बाजूने असल्याचे दिसत होते. त्यावेळी राज्यातील लोकसभेच्या 10 पैकी 5 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकतर्फी विजय मिळवेल, असे मानले जात होते. एक्झिट पोलमध्येदेखील काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र आता वेगळेच निकाल समोर आले आहेत. निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता हरियाणात भाजपने जिंकलेली लढाई कशी जिंकली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला 4 महिने मागे जावे लागेल. लोकसभा निवडणुकीत हरियाणात पराभव स्वीकारल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

निवडणूक प्रभारी ठरवण्याचा निर्णय 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांचे सर्वात विश्वासू नेते धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली होती. भाजपने प्रधान यांना हरियाणाचे निवडणूक प्रभारी बनवून त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. 

कशी आखली रणनीती?

निवडणुकीची कमान मिळाल्यानंतर धर्मेंद्रे प्रधान यांनी हरियाणात नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली. राज्यातील ज्या जागा भाजपच्या विरोधात जास्त आहेत त्या जागा त्यांनी ओळखल्या.  यानंतर अपक्षांना हाताशी धरुन त्यांनी भाजपविरोधी मतांचे विभाजन केले. हरियाणातील निवडणूक जाट विरुद्ध जाट अशी कशी राहील यासाठी भाजपच्या रणनीतीकारांनी जोरदार काम केले. यामुळेच हरियाणात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत आला असून लवकरच सरकार स्थापन करणार आहे.