Bihar Man: बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका वकिलाने मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान करु न शकल्यामुळं रेल्वेला 50 लाख रुपयांची नोटीस बजावली आहे. राजन झा असं या व्यक्तीचे नाव असून त्याने मुझफ्फर ते प्रयागराजला जाण्यासाठी तीन जणांसाठी तिकीट बुक केले होते. मात्र रेल्वेच्या कारभारामुळं त्यांना कोचपर्यंत पोहोचताच आलं नाही.
राजन झा नावाच्या व्यक्तीने मुझफ्फुरहून प्रयागराजला जाण्यासाठी स्वतंत्रता सेनानी ट्रेनच्या थर्ड एसी कोचची स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी अशी तीन तिकीट बुक केली होती. परंतु, रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळं त्यांना कोचपर्यंत पोहोचता आलं नाही. त्यामुळं राजन यांनी रेल्वेकडे तक्रार केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
राजन यांनी मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 27 जानेवारी रोजी एसी कोचसाठी B3मध्ये सीट नंबर 45,46,47 क्रमांकाची सीट बुक केली होती. ट्रेन रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुटणार होती. राजन त्यांच्या सासू-सासऱ्यांसोबत अडीच तास आधीच म्हणजेच 7 वाजल्यापासूनच स्थानकात पोहोचले होते. राजन यांनी म्हटलं की, ट्रेनमध्ये ज्या कोचमध्ये माझी सीट होती त्याचा दरवाजा आतून बंद होता.
महाकुंभमध्ये जाणाऱ्या अमृत स्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांची स्टेशनमध्ये खूप गर्दी केली होती. स्टेशनमध्ये गोंधळाचे वातावरण होते. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळं ते व त्यांचे कुटुंब त्या कोचपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांची ट्रेन सुटली. राजन यांनी या प्रकरणात वकीस एस के झा यांच्या मदतीने 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई रेल्वेकडून मागितली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, वकील एसके झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण अधिनियमअंतर्गंत सेवा देण्यास कमी पडली आहे. ज्यात रेल्वेच्या निष्काळजीपणामुळं राजन यांना त्यांच्या कुटुंबांसोबत अमृत स्नानासाठी जाता आलं नाही. कोचचा दरवाजा न उघडता आल्यामुळं ते प्रयागराजला पोहोचू शकले नाही.