कोल्हापूर हादरले! मोलकरणीच्या मुलाने निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून बंदूक चोरली, माळरानावर जाऊन...

Kolhapur News Today: कोल्हापुरात अल्पवयीन मुलाचा हवेत गोळीबार निवृत्त पोलीस अधिका-याची रिव्हॉल्वर मुलानं चोरली  

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 4, 2025, 12:22 PM IST
कोल्हापूर हादरले! मोलकरणीच्या मुलाने निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून बंदूक चोरली, माळरानावर जाऊन... title=
crime news minor old boy stole a retired police officer pistol and fired in the air in kolhapur

प्रताप नाईक, झी मीडिया

Kolhapur News Today: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लहान मुलाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एका निवृत्त पोलीस अधिका-याच्या घरी काम करणा-या महिलेच्या मुलानं  रिव्हॉल्वर चोरली असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलाने रिव्हॉल्वर चोरून माळरानावर नेली आणि तिथेच खेळण्यातील बंदुकी प्रमाणे 30 राऊंड फायर केले. रिव्हॉल्वरमधील गोळ्या संपल्यानं हा मुलगा रिव्हॉल्वर माळरानावरच टाकून घरी परतला. पोलिसांनी विश्वासात घेऊन मुलाची चौकशी केली त्यानंतर या मुलानं चोरीची कबुली दिली.

निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेसोबत एक दिवस तिचा मुलगा घरी आला होता. तेव्हा त्याने कपाटातील रिव्हॉल्वर बघितली. त्यानंतर मुलाने ती रिव्हॉल्वर चोरली. रिव्हॉल्वर सापडत नसल्याने निवृत्त अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चोरीचा गुन्हादेखील दाखल केला होता. 

पोलिस तपासात मोलकरणीचा मुलगा घरी आला होता हे समोर आलं होतं. त्यानंतर मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मुलाला विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांना खरं खरं सांगून टाकलं होतं. रिव्हॉल्वर चोरून ती घेऊन माळरानावर गेला आणि त्याने 30 राउंड फायर केले. गोळ्या संपल्याने त्याने तिथेच रिव्हॉल्वर टाकून पळ काढला. 

मुलाने जबाब दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. तसंच, या मुलाकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, अल्पवयीन मुलाकडून अंधाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात माळरानावर कोणीही नसल्याने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही व मोठी जिवीतहानी टळली आहे. या प्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.