Mumbai BMC Budget 2025-2026 : देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ख्याती असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी (4 फेब्रुवारी 2025) सादर करणअयात आला. या अर्थसंकल्पात तब्बल 14.19 टक्के वाढ झाल्याची बाब लक्षात आली. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना हा अर्थसंकल्प सादर केला.
मुंबई मगानगरपालिकेच्या या अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे जाळे, फुटपाथ यांच्यासाठी 5हजार 100 कोटींची तरतूद करण्यात आली. तर, शहरासाठी वर्षभरामध्ये तब्बल 74,427.41 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या तरतुदी पाहता आता मुंबईचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवत त्यासाठी सढळ हस्ते निधी दिला जात असल्याचं स्पष्ट होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत निवडणुका तोंडावर असतानाच शहरातील झोपडपट्टीतील गाळेधारकांसाठी नवा कर लागू करण्यात आला आहे. परिणामी गाळेधारकांना मुंबई महापालिकेचा कर भरावा लागणार आहे.
झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना कर भरावा लागणार असून, या माध्यमातून साधारण 350 कोटी इतका महसूल अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२५- २६ चे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका प्रशासक श्री. भूषण गगराणी यांना महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात आज सादर करण्यात आले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज 'ई'… pic.twitter.com/za0ftuEiO6
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 4, 2025
मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या असून, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर केला जातो. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार आहे.