सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांकी वाढ; 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्याच!

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहेत आजचे दर   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 4, 2025, 12:54 PM IST
 सोन्याच्या दरात पुन्हा उच्चांकी वाढ; 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्याच! title=
gold price today hits new high on MCX spot gold above 83,500 10 gram silver price rise

Gold Price Today: आज देशांतर्गंत व आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याला झळाळी मिळाली आहे. सोमवारी सोन्याच्या दरांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठला आहे. आज मंगळवारी सोन्याचे दरात मोठी वाढ झाली आहे. MCX वर सोनं 83,500 रुपये प्रतितोळा वर व्यवहार करत आहेत. तर, वायदे बाजारातही सोन्याने सर्व विक्रम मोडित काढले आहेत. 

सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. MCX वर चांदी 94,360 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. मागील सत्रात चांदी 94,257 रुपयांवर स्थिरावली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 35 रुपयांची घट झाली आहे. स्पॉट मार्केटमध्य चांदीची किंमत 96,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्समध्ये गोल्डचा भाव 2,827.50 डॉलर प्रति औंसच्या जवळपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली आहे. मात्र घरगुती बाजारात रुपया घसरल्यामुळं सोन्याच्या दरात झळाळी आली आहे. काल रुपया डॉलरच्या तुलनेत 87.17 रुपयांवर स्थिरावला. ज्यात सोन्याच्या किंमती अधिक वाढल्या. 

आज सोन्याच्या दरात 1,050 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 78,100 रुपयांवर स्थिरावलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,050 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 78,100 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 860 रुपयांची वाढ झाली असून सोनं 63,900 रुपयांवर स्थिरावलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  78,100 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 85,200 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  63,900रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,810 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,520 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,390 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   62,480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   68,160 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    51,120 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 78,100 रुपये
24 कॅरेट- 85,200 रुपये
18 कॅरेट- 63,900रुपये