दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!'

Anjali Damania On Dhananjay Munde:  अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या घोटाळ्याचे आरोप केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 4, 2025, 12:18 PM IST
दमानियांचा सर्वात मोठा बॉम्ब; मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाल्या- 'आता राजीनामा द्यावाच लागेल!' title=
fraud in nano yuria and nano dap Anjali damania allegation on dhananjay munde

Anjali Damania On Dhananjay Munde:  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तसंच, मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप दमानियांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 

दमानिया यांनी म्हटलं आहे की, 'एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे किती पैसे खातो याबाबत मी आज पुरावे देणार. DBT ही योजना सरकारने काढली होती. या योजनेचे पैसे लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी एक GR काढण्यात आला होता. १२ एप्रिल २०१८ रोजीचा जीआर मुख्यमंत्र्यांना ही जी ६२ आयटम्सची लिस्ट आहे जे डीबीटी खाली येणार आहे. त्या ६२ आइटमला अॅड करण्याची मुभा ही मुख्यमंत्र्यांना आली आणि म्हणजे यातून काही आइटम वगळू शकत नाही पण मुख्यमंत्री त्यात अॅड करू शकतात. जर यातील काही आइटम वगळायचे असतील तर एक कमिटी बनविण्यात आली होती'

'आपल्याकडे काही विक्रमी प्रोडक्शन केले. त्यात १००० कोटींचा आकडा आला.१२ मार्च २०२४ रोजी एक जीआर आला की नियंत्रण सर्व कृषी अधिकारी करतील. तेव्हा अधिकारी प्रवीण गेडाम होते. त्यांनी म्हटल MIDC हे बीज बनवत नाही. त्यामुळं त्यांनी म्हंटल की जी बीज आपण बनवत नाही त्याचे पैसे थेट शेतकऱ्याला द्यायला हवे. पण यावर धनजय मुंडे म्हणतात डायरेक्टरला फोन करतात आणि बोल करतात. यात मग अधिकारी म्हटले मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल. यात मुख्यमंत्र्यांना नेमकं काय प्रकरण हे माहीत नसावं. अजित पवार उपमुखमंत्री होते त्यांनी सही केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे होते,' असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

१८४ लिटरची नॅनो युरियाची बॉटल ९२ रुपयांची आहे. पण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्यात तब्बल 220 रुपयांना ही बॉटल विकत घेतली गेली. कृषीमंत्री यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल्स या 220 रुपयांनी घेतल्या. दुपट्टीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल्स विकत घेतल्या. चर 500 रुपयांच्या बॉटलचा बाजारभाव 269 रुपये पण 590 रुपयांना त्याची खरेदी केली आहे. या दोन गोष्टींचा एकूण घोटाळा 88 कोटींचा आहे. 

बॅटरी स्प्रेअर हा आधीपासून Maidcच्या वेबसाइटवर मिळतोय आत्ताच्या घटकेला 2450 रुपयांना घेतला जातोय. पण माननीय कृषीमंत्री 3426 रुपयांचा टेंडर विकत घेताय. एक हजाराच्या वर बॅटरी स्प्रेअरवर कमवले आहेत. जवळपास 2 लाख 36 427 बॅटरी स्प्रेअर विकत घेतले आणि त्याची किंमत 3 हजारवर आहे. जुलै 23 ते नोव्हेंबर 24 एका वर्षात या व्यक्तीने इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची त्यांचे मंत्रीपद ठेवण्याची खरंच गरज आहे का. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असा आरोपही दमानियांनी केला आहे. एकूण 161.68 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असं दमानियांनी म्हटलं आहे.