भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी घडणार! राष्ट्रपती भवनात होणार भव्य लग्न सोहळा

Poonam Gupta : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात विवाह सोहळा संपन्न होणार आहे. जाणून घेऊया  राष्ट्रपती भवनात कुणाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 3, 2025, 08:50 PM IST
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी घडणार! राष्ट्रपती भवनात होणार भव्य लग्न सोहळा title=

Rashtrapati Bhavan: राष्ट्रपती भवन ही देशातील सर्वात मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. याच राष्ट्रपती भवनात भव्य लग्न सोहळ पार पडणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे. या लग्न सोहळ्याची देशभरात चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया  राष्ट्रपती भवनात कोणाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला परवानगी कुणी दिली? 

राष्ट्रपती भवनात प्रथमच एका लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात पार पडणारा हा विवाह सोहळा साध्या सुध्या व्यक्तीचा नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकारी पूनम गुप्ता यांचा शाही विवाह सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या परवानगीनेच राष्ट्रपती भवनात  हा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. 

हे देखील वाचा... भारतातील 2,43,93,60,00,000 कोटींच्या राजमहलात फिरा फक्त 150 रुपयांत; 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती आणि... 

 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचालनात सीआरपीएफच्या महिला पथकाचे नेतृत्व पूनम गुप्ता यांनी केले होते. अधिकारी पूनम गुप्ता यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीने राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू प्रभावित झाल्या आहेत. विशेष म्हणजे पूनम गुप्ता या राष्ट्रपती भवनात कार्यरत आहेत. पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या खासगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ – पर्सनल सेक्युरिटी ऑफिसर) देखील आहेत. 

पूनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) साहाय्यक कमांडंट या पदावर कार्यरत आहेत. गणितात पदवीचे शिक्षण घेतलेल्या पूनम गुप्ता यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ग्वालियर येथील जिवाजी विद्यापीठातून त्यांनी बी.एड केले आहे. 2018 मध्ये पूनम गुप्ता यांनी UPSC CAPF (सीएपीएफ – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) परीक्षेत देशात 81 वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांची नियुक्ती बिहारमधील नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती.

12 फेब्रुवारी 2025 रोजी पूनम गुप्ता यांचे लग्न होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफचे डिप्युटी कमांडंट अविनीश कुमार यांच्यासोबत त्या लग्नबंधनात अडकणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पूनम गुप्ता यांच्या लग्नाविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनीच त्यांना राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये लग्न करण्यासाठी सूचवल्याची चर्चा आहे. काही ठराविक नातेवाईक, VVIP गेस्ट तसेच मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या विवाह सोहळ्याची खास चर्चा देशभर रंगली आहे.