Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. किंग खान गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडच्या जगावर राज्य करत आहे आणि आता त्याची मुलंही मनोरंजनाच्या जगात प्रवेश करणार आहेत. त्याची मुलगी सुहाना खानने 'द आर्चीज'मधून पदार्पण केले आहे आणि आता त्याचा मुलगा आर्यन खानही दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश करत आहे. हा कार्यक्रमाचे नाव 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' आहे, जो शाहरुखच्या मुलाने, आर्यन खानने दिग्दर्शित केला आहे. शाहरुखने इन्स्टाग्रामवर एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शूट करत असताना रिटेक्समुळे चिडलेला दिसतो. हे प्रकरण खूपच मजेदार बनलं, कारण शाहरुख चिडून दिग्दर्शकाला विचारतो, 'तेरे बाप का राज है क्या?' आणि त्यावर आर्यन खान बॅकग्राउंडमध्ये उभा राहून 'हो' म्हणतो. यावर शाहरुख चिडून म्हणतो, 'आता मी टेक देणार आणि तुम्ही सगळ्यांनी पाहा आणि शिका सुद्धा'. त्यानंतर त्याने एका टेकमध्ये शोबद्दल सांगितल्यावर आर्यन खान पुन्हा म्हणतो 'कॅमेरा रोल झाला नव्हता पुन्हा एकादा टेक घेऊयात?' यावर शाहरुख खान आर्यनच्या मागे पळत जातो.
शाहरुख खानने या शोबद्दल सांगितलं की, हा एक कौटुंबिक शो आहे आणि त्यात आर्यनची खूप मेहनत आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' हा शो प्रेक्षकांना एक नवीन दृष्टीकोन देईल. शाहरुखने या प्रोजेक्ट्बद्दल सांगितलं की आर्यन खान, बिलाल, मानव, देव आणि अंकित यांसारख्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत केली आहे.
या शोच्या माध्यमातून, शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन एकत्र काम करत असल्याने, या प्रोजेक्टचे विशेष आकर्षण आहे. शाहरुखने सांगितले की नेटफ्लिक्सशी त्याचा संबंध कौटुंबिक आहे, कारण त्याला ही प्लॅटफॉर्म कुटुंबासारखीच वाटते. 'माझ्या कामाची प्रेरणा आणि प्रेम मोठं आहे. यामुळे भारतीय प्रेक्षकांना हे शो निश्चितच आवडेल, असं मला विश्वास आहे,' असं शाहरुखने म्हटलं.
हे ही वाचा: ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा!
तसेच, शाहरुखने आपल्या मुलाच्या आगामी दिग्दर्शनाबद्दल अभिमान व्यक्त केला आणि म्हटलं की, जरी त्याला केवळ 50% प्रेम मिळालं तरी ते त्याच्यासाठी पुरेसे असेल. या सर्व गोष्टींवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, शाहरुख खानचा आपल्या मुलांसोबत असलेला सखोल संबंध या शोमध्ये दिसून येणार आहे.