गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खानचा लेक जुनैद खान आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. नुकतच 'लव्हयापा'या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं. यावेळी अनेक कलाकारांनी त्यासोबतच सचिन तेंडुलकर, रेखा आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज ठाकरे हे 'लव्हयापा'चित्रपट पाहून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत सचिन तेंडुलकर, आमिर खान, जुनैद खान देखील दिसत आहे.
राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राज ठाकरे, सचिन तेंडुलकर आणि आमिर खान यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिथे उभे असणारे पापाराझींनी राज ठाकरे यांना विचारले की, चित्रपट कसा वाटला? त्यावर राज ठाकरे यांनी फक्त आपल्या हातांनीच मस्त असं सर्वांना सांगितलं. त्यासोबतच त्यांनी superb असल्याची देखील प्रतिक्रिया दिली. म्हणजेच राज ठाकरे यांना आमिर खानचा लेक जुनैद खानचा 'लव्हयापा' हा चित्रपट प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरेंसह इतर कलाकारांनी देखील स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.
'लव्हयापा' चित्रपटामध्ये काय?
सोशल मीडियावर 'लव्हयापा' चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 'लव्हयापा' हा चित्रपट 7 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामध्ये खुशी कपूर आणि आमिर खानचा लेक जुनैद खान या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. रोमँटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटात अभिनेते आशुतोष राणाही दिसणार आहेत. हा चित्रपट आजच्या पिढीच्या प्रेमाचं चित्रण मांडणारा चित्रपट आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.