Ola Roadster Series Bikes: देशातील आघाडीची ईव्ही उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक मोटरसायकल दमदार एन्ट्री केली आहे. ओला कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. तिचे दमदार फिचर्स आणि किंमत पाहून इतर कंपन्यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. ओला कंपनीने भारतीय बाजारात OLA Roadster X आणि OLA Roadster X+ लाँच केले आहेत. ओलाच्या आधीच्या बाईकने ग्राहकांची निराशा केली होती. त्या बाईकमध्ये बॅटरीच्या अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान नवीन अपडेटसह ओला कंपनी पुन्हा ग्राहकांच्या भेटीला आली आहे. सध्या ही बाईक 15 हजार रुपयांच्या सवलतीत मिळतेय. म्हणजेच तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल तर 74 हजार 999 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येते.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये एकदा चार्ज केल्यानंतर 252 किमी पर्यंतची रेंज देण्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 50 हून अधिक स्मार्ट फीचर्स दिले आहेत. त्यात क्रूझ कंट्रोल सारखे फिचर्सदेखील आहेत. कंपनीने रोडस्टर एक्स मालिकेतील दोन बाईक सादर केल्या आहेत. रोडस्टर एक्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 74 हजार 999 रुपये आहे. यासोबतच रोडस्टर X+ (4.5kWh) ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 4 हजार 999 रुपये आहे. दुसरीकडे रोडस्टर X+ 9.1kWh (4680 भारतात) प्रकाराची किंमत 1 लाख 54 हजार 999 रुपयांत घेता येणार आहे. कंपनीने रोडस्टर एक्स तीन बॅटरी प्रकारांमध्ये येते. यात 2.5 किलोवॅट प्रति तास, 3.5 किलोवॅट प्रति तास आणि 4.5 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे. तिन्ही प्रकारांची किंमत अनुक्रमे 74 हजार 999, 84 हजार 999 आणि 94 हजार 999 रुपये इतकी आहे. त्यावर सुरुवातीची 3 वर्षे किंवा 50 हजार किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. या बाईकची डिलिव्हरी मार्चच्या मध्यापासून सुरू होणार आहे.
रोडस्टर एक्स तीन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना 2.5 किलोवॅट, 3.5 किलोवॅट आणि 4.5 किलोवॅट क्षमतेचे बॅटरी पॅक मिळतील. एका चार्जवर 252 किमीचा रेंज मिळण्याचा दावा केला जातो आणि ही बाईक 0 ते 40 चा वेग गाठण्यासाठी 3.1 सेकंद घेईल. बाईकचा पॉवर आउटपुट 7 किलोवॅट पीक पॉवर आहे आणि तिचा टॉप स्पीड 118 किमी प्रतितास आहे.
या बाईकमध्ये 2 बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. त्यात 4.5 kwh आणि 9.1 kwh चा पर्याय देण्यात आला आहे. यात 9.1kwh बॅटरी पॅक देण्यात आला असून एकदा चार्ज केल्यावर 501 किमीची रेंजचा दावा कंपनीने केलाय. 11 किलोवॅटची कमाल शक्ती आणि 125 चा कमाल वेग देण्यात आलाय. यात फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला असून 0 ते 40 स्पीडपर्यंत पोहोचण्यासाठी 2.7 सेकंद लागतात.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने ब्रेक-बाय-वायर तंत्रज्ञानासह या बाइक्सनी बाजारात एन्ट्री केलीय. याला सिंगल एबीएससाठी सपोर्ट असून बाईकला स्मार्ट मूव्हओएस 5 फीचर्ससह अॅडव्हान्स रीजनरेशन, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्स मोड देण्यात आलाय. एवढेच नव्हे तर या बाईकमध्ये देण्यात आलेल्या बॅटरीला IP67 वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ सर्टिफिकेशन आहे. या दोन्ही बाईक्समध्ये 4.3 इंचाचा रंगीत एलसीडी डिस्प्ले असून ही बाईक 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाईकमध्ये 50 हून अधिक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. सर्व ई-बाईकवर ग्राहकांना तब्बल 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळतोय. हा डिस्काऊंट मर्यादित कालावधीसाठी असणार आहे.