आस्थेचा बाजार बरखास्त; लड्डूगोपाल बाबा सुटणार?
नाशिकमध्ये आस्थेचा दरबार भरविणाऱ्या बाबानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. बाबाच्या भक्तांनीच बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आता सुटका करुन घेण्यासाठी बाबाची धावपळ सुरू आहे.
Oct 23, 2012, 02:27 PM ISTबाप्पाच्या निरोपाची लगबग
मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मानाचा पहिला गणपती `गणेश गल्लीचा राजा` तर पुण्यात कसबा गणपतीनेही प्रस्थान करण्यास सुरूवात केली आहे
Sep 29, 2012, 11:41 AM ISTनाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`
नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं यातून स्पष्ट होतंय.
Sep 29, 2012, 08:17 AM ISTनाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात...
नाशिक महापालिकेनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृती आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. हा आराखडा वादात अडकलाय. यंदाच्या आराखड्यात मागच्या आराखड्यातूनच उचलेगिरी केल्याचा आरोप होतोय.
Sep 7, 2012, 08:47 AM ISTयशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता.
सचिन तेंडुलकरनं यावेळी दिलखुलास मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सगळे महत्वाचे निर्णय हे साहित्य सहवासमध्येच घेतल्याचही त्यानं यावेळी सांगितलं.
चांदण्या पाठीच्या कासवामुळं तस्करीचा पर्दाफाश
नाशिक जिल्ह्यात सध्या कासवं, घुबडं यांची अंधश्रद्धेपोटी तस्करी होतेय. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवहारातून होते. नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये या कासवाची विक्री होत होती. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला आणि पुढचा अनर्थ टळला.
Sep 1, 2012, 12:10 AM ISTअल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. खासगी क्लासमधून परतत असताना या मुलीला तीन नराधमांनी कारमध्ये कोंबून चालत्या कारमध्ये बलात्कार केला.
Aug 24, 2012, 03:37 PM ISTरखडल्यात अनेक `सावरपाडा एक्सप्रेस`!
कवितानं घेतलेल्या मेहनतीला सोयी सुविधांची जोड मिळाली असती तर ती ऑलिम्पिकसाठीही पात्र होऊ शकली असती. अशा अनेक कविता नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागात आहेत. पण सुविधा नसल्यानं अशा अनेक सावरपाडा एक्सप्रेस रखडल्यात.
Aug 21, 2012, 08:16 AM ISTबस चालकांची गुर्मी; विद्यार्थी करतायत भरपाई
विद्यार्थ्यांची ही तोबा गर्दी.... बस थांब्यावर न थांबता सुसाट धावणाऱ्या बस... बसमागे दप्तराचं ओझं सांभाळत धावणारे विद्यार्थी... नाशिकमध्ये कुठल्याही बसस्टॉपवर दिसणारं हे दृश्यं... चालक बसस्टॉपच्या आधी तरी बस थांबवतो किंवा नंतर तरी... पण बस स्टॉपच्या ठिकाणी बस कधीच थांबत नाही...
Jul 25, 2012, 09:31 AM ISTएका गावाचे सतराशे साठ नवरे!
त्रिंबकेश्वर नगरपालिकेत लोकशाहीची थट्टा सुरू आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात तब्बल पंधरा नगराध्यक्ष शहराच्या नशिबी आलेत. महाप्रसादाप्रमाणे नगरसेवकांना नगराध्यक्ष पद दिलं जात आहे.
Jul 19, 2012, 09:17 AM ISTकोर्टाच्या आदेशांना दाखवला 'भंगार बाजार'
अंबड सातपूर लिंक रोडवरचा भंगार बाजार हटविण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. हायकोर्टानं बाजार हटविण्याचे आदेश दिलेत तरिही महापालिका प्रशासन पावलं उचलत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर हे काम करणार कधी? या मुद्यावरून महापालिका आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलसवी सुरू आहे.
Jul 18, 2012, 09:37 AM ISTनिळ्या बसचा मोफत प्रवास
ग्रामीण भागात एस.टी. च्या बसला लाल डब्बा असंही म्हटलं जातं. मात्र आता नाशिकसह राज्यातल्या १२५ तालुक्यात 'मानव विकास योजने' अंर्तगत मुलींना शिक्षणाकडे आर्कषित करण्यासाठी निळ्या रंगाच्या बसची मोफत सेवा सुरू करण्यात आलीये.
Jul 15, 2012, 02:46 PM ISTयुवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Jul 15, 2012, 12:58 PM ISTपोटच्या मुलीनेच केली आईची हत्या
www.24taas.com, नाशिक
प्रेमाला विरोध केला म्हणून मुलीनंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडलीय.... अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आईचा खून केला आणि मृतदेह कसारा घाटात फेकला.
Jul 5, 2012, 07:51 PM IST
बळीराजा ठरलाय नाशिक अर्थव्यवस्थेचा कणा
पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बळीराजा घेणार आहे.
Jul 4, 2012, 08:57 PM IST