बोगस व्होटिंग - अजूनही कारवाई नाहीच
नाशिकमधल्या बोगस व्होटिंग प्रकरणी अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. हा प्रकार उघड करुन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासन ढिम्मच आहे.
Feb 28, 2012, 05:56 PM ISTनाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक
बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत.
Feb 21, 2012, 09:57 PM ISTपैसेवाटपावरून मनसेचा राडा
नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.
Feb 16, 2012, 05:32 PM ISTनाशिक अपघातात तीन ठार
साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.
Feb 11, 2012, 05:42 PM ISTराष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक
नाशिकमधल्या सातपूर परीसरातील शिवाजीनगर भागात राष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.
Feb 11, 2012, 04:40 PM IST'नात्यागोत्या'तली निवडणूक !
आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी आणि सर्वच पक्षांनी नात्यागोत्यांना तिकीटं दिली आहेत. नाशिकची निवडणूकही याला अपवाद नाही. नाशिक मनपाचं महापौर पद भूषवलेल्यांचे अनेक नातेवाईक सध्या निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहेत.
Feb 11, 2012, 11:41 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर आयुक्तांची बदली
ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिक महापालिका आयुक्त बी.डी.सानप यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी पी.वेलरासू यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
Feb 11, 2012, 11:04 AM ISTपोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
नाशिकमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एका रिक्षावाल्यानं ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी रिक्षावाल्याला अटक करण्यात आलीय.
Feb 10, 2012, 06:18 PM ISTराज ठाकरेंचा नाशिकमध्ये 'रोड शो'
पुण्यापाठोपाठ राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होतोय. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार आहेत. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
Feb 9, 2012, 04:26 PM ISTदेवळाली कॅम्पमध्ये मतदान केंद्रास आक्षेप
नाशिकचं हे देवळाली लष्करी प्रशिक्षणार्थी केंद्रात काही प्रशिक्षण घेणारे तर काही सैनिक राहतात. याच ठिकाणी प्रभाग क्रमांक ५४चं मतदान केंद्र उभारलं जात आहे. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत.
Feb 9, 2012, 02:22 PM ISTनाशिकमध्ये मनसे कार्यालय जाळलं
नाशिकमध्ये वाहनांचं जळीतकांड ताजं असतानाचं आता राजकीय पक्षांची उमेदवारांची प्रचार कार्यालयंही टार्गेट होऊ लागली आहेत. नाशिकच्या पवननगर भागात मनसेचं प्रचार कार्यालय जाळण्यात आलं आहे.
Feb 9, 2012, 10:52 AM ISTनिवडणुकीच्या रिंगणात चहावाला
निवडणूक लढवायची असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. त्याचसोबत ‘गॉडफादर’चा आशिर्वादही महत्वाचा असतो. नाशिकमध्ये मात्र चहाचा टपरीवाला निवडणुकीच्या रंगणात उतरला आहे.
Feb 8, 2012, 10:07 AM ISTनाशिकमधले 'मालामाल' उमेदवार!
नाशिक महापालिका निवडणुकीच्या मैदानात अनेक कोट्यधीश उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्या आशा सानप यांच्याकडे तब्बल दीड किलो सोनं आहे. तर सर्वाधिक श्रीमंत उमेदवाराचा मान मिळाला आहे काँग्रेसच्या उद्धव निमसेंना.
Feb 4, 2012, 07:21 AM ISTनाशकात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की
नाशिकमध्ये तिकीट वाटपात डावलल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना धक्काबुक्की केली. सर्वसाधारण गटातून उज्वला नामदेव हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची आदळआपट केली.
Feb 1, 2012, 05:10 PM ISTनाशिकमध्ये महाआघाडी ?
नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.
Jan 27, 2012, 10:52 PM IST