शेतकऱ्याच्या प्रेमात बॉलिवूड स्टार
नाशिकच्या भाजीपाला पिकवणा-या शेतक-यांनी मुंबईच्या कलाकारांना चांगलीच भुरळ घातली आहे. सेंद्रीय शेतीद्वारे पिकवला जाणारा हा भाजीपाला कौतुकाचा विषय ठरलाय. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान, किरण राव, जॉकी श्राफ, रमेश देव अशी बॉलीवूडमधल्या अनेक स्टार मंडळींसह परदेशी नागरिकही या शेतक-यांच्या प्रेमात प़डलेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करून या शेतक-यांनी आपला स्वतःचा खास ओर्ग्यानिक ब्रँडही विकसित केला आहे.
Apr 21, 2012, 05:12 PM ISTनाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी
पुण्यानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. आता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने पहिला बळी घेतला आहे. नंदू चव्हाण असं या मृत व्यक्तिचं नाव आहे.
Apr 3, 2012, 09:27 PM ISTनाशिक शहरातून जकात हटवा मोहीम
नाशिक शहरातून जकात हटवा, अशी मोहीम जोरदार सुरू झालीय. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केलाय. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागलेत.
Mar 31, 2012, 08:12 AM ISTनाशिकमध्ये ‘जकात हटवा’ मोहीम
नाशिक शहरातून ‘जकात हटवा’ मोहीम जोरदार सुरू झाली आहे. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केला आहे. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागले आहेत.
Mar 29, 2012, 10:38 PM ISTनाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?
आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.
Mar 26, 2012, 08:50 PM ISTमराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला
आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.
Mar 23, 2012, 03:59 PM ISTनाशिकमध्ये मनसेचा 'वाघ' महापौर
नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.
Mar 15, 2012, 03:40 PM ISTमनसेला पाठिंबा देण्याचे भाजपचे संकेत
नाशिकमध्ये जनादेशाचा आदर केला जाईल असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच शिवसेनेनं महापौरपदासाठी दावा केला आहे. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशीची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 07:48 PM ISTमनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!
मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशकात शिवसेनेचे मनसेवर दबावतंत्र?
नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेवर दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. हे दबावतंत्र आहे, महापौर निवडणुकीसाठी. नाशिकमध्ये मनसेने जास्त जागा पटकावून नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान पटकावले आहे. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याने सत्तेसाठी मनसेला कसरत करावी लागणार आहे. याच संधीचा लाभ उठवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी दबावतंत्रचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
Mar 8, 2012, 11:00 PM ISTनाशिक महापालिकेची अंतिम महासभाही वादग्रस्तच
नाशिक महापालिकेची शेवटची महासभाही वादग्रस्त ठरली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी ५ ते ६ तहकूब महासभांच्या इतिवृतांना मंजूरी देण्यात आली. त्यामुळं या निर्णयाविरोधात विरोधक राज्य सरकार आणि न्यायालयात दाद मागणार आहेत.
Mar 3, 2012, 10:14 PM ISTराज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम
महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.
Mar 2, 2012, 08:16 AM ISTनाशिकमध्ये चोरट्यांचा धुडगूस
नाशिकमध्ये वाहनं जाळपोळीच्या घटनांनी धुडगूस घातला असतानाच नागरिकांना आता चोरट्यांनीही हैराण केलं आहे. वाढत्या चोऱ्याची नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
Mar 1, 2012, 01:01 PM ISTबोगस मतदान अहवाल देण्याचे आदेश
नाशिकच्या मतदार यादीत तब्बल सव्वा लाख नावं बोगस आढळलीत. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगानं सात तारखेपर्यंत अहवाल सादर कऱण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Feb 29, 2012, 07:25 PM IST