Drunk police Inspector Viral Video: पोलीस परिसरात उभे असले की त्यांचा दरारा असतो. त्यांच्या वर्दीला मान सन्मान दिला जातो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जरब बसते. पण काही पोलीस त्यांच्या वर्दीला काळीमा फासण्याचा प्रकार करतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संबंधित पोलिसाविषी चीड व्यक्त करण्यात येत आहे.
एका मद्यधुंद पोलिसाने खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे. यूपीच्या कासगंज जिल्ह्यातील बस स्टॉपवर हा प्रकार घडला आहे, ज्यामुळे खाकी कलंकित झाली आहे. दारूच्या नशेत असलेला एका पोलिस निरीक्षक पत्नीसोबत अश्लील कृत्य करताना दिसतोय. निरीक्षक पोलिस लाईनमध्ये तैनात होता. सध्या पोलीस अधीक्षकांनी आरोपी निरीक्षकाला निलंबित केले असून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महिलेसोबत अश्लील कृत्य करणारा निरीक्षक कासगंजच्या पोलिस लाईनमध्ये तैनात आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आरोपी निरीक्षक पोलिस कार्यालयाच्या गेटजवळील प्रवासी शेडमध्ये बसलेला दिसतोय. दारू पिऊन आलेला इन्स्पेक्टर त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने अश्लील कृत्य करत आहे. पत्नी त्याच्यापासून आपला बचाव करताना दिसतेय.
In #UttarPradesh's Kasganj, video of drunken inspector goes viral!!
Drama going on just 50 meters away from SP office, drunk inspector is ruining the dignity of uniform
Sitting in a public place, doing obscene acts with a woman, "Inspector took off his cap and said I am fake!!" pic.twitter.com/wKAFiXmhsi
— Siraj Noorani (@sirajnoorani) February 20, 2025
अश्लिल चाळे करताना पोलिसाला त्याचे स्वत:च्या टोपीकडेही लक्ष नव्हते. त्याची टोपी प्रवासी शेडच्या मागे पडलेली दिसते. निरीक्षकाची पत्नी त्याची टोपी उचलताना दिसतेय. कृपया काहीही रेकॉर्ड करू नका अशी विनंती व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला करतेय. आपण दारु प्यायलोय हे तो पोलीस कबूल करतोय. मी कोणाशीही गैरवर्तन करत नाहीय. मग दारू पिण्यात काय अडचण आहे? असे तो व्हिडीओ बनवणाऱ्याला विचारतोय.तुम्ही पोलीस गणवेशात असताना दारू का प्यायलात? असा प्रश्न त्यांना वितारण्यात आला. यानंतर संबंधित पोलिसांनी अपशब्द वापरण्यास सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.
खाकी वर्दीची बदनामी होण्याची ही पहिलीच घटना नाही. मद्यधुंद अवस्थेत असलेले काही पोलीस असे कृत्य करतानाच्या घटना अनेकदा समोर येत असतात. दरम्यान या प्रकरणातील आरोपी इन्स्पेक्टरचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. तो त्याच्या पत्नीसोबत कुठेतरी फिरायला आला होता आणि प्रवासी शेडमध्ये बसून त्याने दारूच्या नशेत पत्नीसोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. मग कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. सध्या पोलीस अधीक्षक अंकिता शर्मा यांनी आरोपी निरीक्षकाला निलंबित केले आहे. आणि त्याची विभागीय चौकशीदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.