Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला (Champions Trophy 2025) सुरुवात झालेली आहे. यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सर्व सामने हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले.
भारत आणि बांगलादेश हे संघ यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त एकदाच समोरासमोर साले आहेत. 2017 रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला होता. तर भारत बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 41 वनडे सामने झाले असून यात 32 वेळा भारताने तर 8 वेळा बांगलादेशने विजय मिळवला आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले.
हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग असून या संघांना 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया सह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, इंग्लंड हे आहेत. प्रत्येक संघ ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येकी तीन सामने खेळतील. यातील प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप दोनवर राहणारे संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील आणि सेमी फायनल जिंकणारे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी फायनलमध्ये लढतील.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
तन्झिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान
मी सुद्धा आधी टॉस जिंकून गोलंदाजी निवडली असती. आम्ही काही वर्षांपूर्वी येथे खेळलो होतो त्यामुळे आम्हाला वाटले की बॉल लाइटच्या खाली चांगला येतो. सर्व छान दिसत आहेत. प्रत्येकजण फिट आहे. आम्ही चांगली सुरुवात करू अशी आशा करूयात. मागे वळून पाहायचे नाही, या स्पर्धेत प्रत्येक खेळ महत्त्वाचा ठरतो. वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंहचा समावेश प्लेईंग 11 मध्ये करण्यात आलेला नाही तसेच रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आलीये.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.