विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी
गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.
Dec 30, 2012, 09:18 PM ISTशेतकऱ्यांचा वाली कोण?
एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.
Nov 14, 2012, 04:38 PM ISTकांदा उत्पादकांना वाव, कांद्याला चांगला भाव
गेल्या काही दिवसांत अनेक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे.
Oct 25, 2012, 03:31 PM ISTपुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा
पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.
Oct 15, 2012, 05:02 PM ISTवर्मांचं तर्कशास्त्र : महागाईचा लाभ शेतकऱ्यांना
महागाईमुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचा अजब शोध त्यांनी लावलाय. इतकंच नाहीतर महागाईमुळं आपल्याला आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Aug 20, 2012, 01:35 PM ISTउदयनराजेंविरुद्ध शेतकऱ्यांना हवाय न्याय
सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा आला. विवेक पंडित यांनी साता-यात महसूल खात्याच्या चुकीच्या धोरणाबाबत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या अन्यायाविरोधात मोर्चा काढला होता.
Jul 17, 2012, 09:18 PM ISTनाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.
May 5, 2012, 11:07 PM ISTरायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.
Feb 29, 2012, 03:21 PM ISTभारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण
कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.
Jan 17, 2012, 09:01 AM ISTशेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर
लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.
Jan 6, 2012, 05:47 PM ISTकांदा शेतकऱ्यांना रडवणार?
गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी धास्तावलाय. सरासरी दर अडीचशे असला तरी किमान दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खाली आलाय.
Jan 4, 2012, 09:51 PM ISTशेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत
एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.
Dec 14, 2011, 12:26 PM ISTशेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'
कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.
Dec 2, 2011, 02:37 PM ISTयांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड
आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.
Dec 2, 2011, 02:36 PM ISTपवनेचं पाणी पुन्हा पेटणार?
बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.
Dec 1, 2011, 05:13 PM IST