Viral Human Mouth Fish : सध्या सोशल मीडियावर दररोज विविध आणि आश्चर्यकारक गोष्टी व्हायरल होत असतात. यात पक्षी आणि प्राण्यांचे व्हिडीओ तर अनेकदा नेटकऱ्यांना तासंतास मोबाईल स्क्रीनवर खेळवून ठेवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. यात एका माश्याचं तोंड हुबेहूब माणसासारखं दिसतंय. या माश्याला पाहून नेटकरी सुद्धा गोंधळात पडले असून या व्हिडीओला सोशल मीडियावर मिलिअन्समध्ये व्यूज आहेत.
आजकाल असे काही ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत जे मानवी ओठ अधिक आकर्षित दिसण्यासाठी केले जातात. अनेक सेलिब्रिटीज अशा ट्रीटमेंट्स करतात. पण तुम्हाला अशा माशाविषयी सांगणार आहोत ज्याचे ओठ कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोकं माशाचे ओठ पाहून लोकं हैराण झाले आहेत. प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की या विचित्र जीवाचे नाव काय? या माशाचे ओठ आणि दात हुबेहूब माणसासारखे दिसतात. व्हिडीओमध्ये व्हायरल होणाऱ्या माशाचे नेमकं नाव अद्याप कळालेले नाही.
What fish is this? pic.twitter.com/lSvy5haZHF
— Nature is Amazing (AMAZlNGNATURE) February 1, 2025
हेही वाचा : कपड्यांवर तेलाचे डाग पडलेत? न धुता काही मिनिटांमध्ये होतील स्वच्छ, वापरा फक्त 1 ट्रिक
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या माशाचे नाव 'ट्रिगरफिश' आहे असे काही लोकांचं म्हणणं आहे. हा मासा अधिकतर खोल समुद्रात आढळतो. @AMAZlNGNATURE या अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारा मासा हा ट्रिगरफिश माशाची एक विशिष्ट प्रजाती असून शिकार करण्याच्या अनोख्या कलेमुळे त्याचे ओठ सपाट होतात जे जवळजवळ माणसांसारखे दिसतात. तसेच या माशाचे दात इतके तीक्ष्ण आहेत जे लोखंड देखील कापू शकतात. ट्रिगरफिशच्या 30-40 प्रजाती असून त्यापैकी बहुतेक प्रजातींचे ओठ समान दिसतात.