अजित पवार खोटारडे – सुभाष देसाई
शेवटी जे वाटत होतं तेच त्यांनी केलंय आणि त्यांनी जनतेला फसवलंय. राजीनाम्याचे नाटक. काही दिवस बाहेर राहायचं. त्याच्यातील हवा काढायची, अशा उद्देशाने त्यांनी दिलेला राजीनामा. पुढे काय झालं. आपणच परीक्षेला बसायचे आणि त्यांनीच पेपर द्यायचे आणि रिझल्ट्ससाठी त्यांनीच पेपर तपासायाचा, अशा प्रकारची लुटूपुटूची लढाई दिसत आहे. असेच राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे, अशी प्रतिक्रिया शिवेसनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.
Dec 6, 2012, 07:20 PM ISTअजितदादा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होँणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे.
Dec 6, 2012, 06:24 PM ISTअजितदादा पुन्हा होणार उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळात फेरबदल?
सिंचनाची श्वेतपत्रिका मांडल्यानंतर लगेचच पुढील आठवड्यात मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे. त्यामुळं अधिवेशनापूर्वीच अजितदादांचे कमबॅक होण्याची शक्यता आहे.
Nov 28, 2012, 08:54 PM ISTअजित पवार अपघातातून बचावले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला आज मुंबईजवळील वाशी खाडी पुलाजवळ ट्रकने धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास डिव्हायडर ओलांडून एक ट्रक अचानक अजित पवार यांच्या ताफ्यात घउसला. अजित पवार हे पुण्याहून मुंबईकडे जात असताना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
Aug 27, 2012, 04:35 PM ISTअजित पवारांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पंढरपूरच्या विठुरायाची सपत्निक पूजा करण्यात आली. राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव, आणि राज्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची शक्ती दे, असं साकडं यावेळी अजित पवारांनी विठुरायाला घातलं.
Nov 6, 2011, 08:17 AM IST