Bank Holiday in March: 1 मार्चला बॅंक सुरु राहणार की बंद? जाणून घ्या संपूर्ण महिन्याची यादी!

Bank Holiday in March:  मार्च महिन्यात एकूण 14 दिवस बॅंक बंद राहणार आहेत

Pravin Dabholkar | Updated: Feb 27, 2025, 01:15 PM IST
Bank Holiday in March: 1 मार्चला बॅंक सुरु राहणार की बंद? जाणून घ्या संपूर्ण महिन्याची यादी!
मार्च महिन्यातील सुट्ट्या

Bank Holiday in March: फेब्रुवारी महिना संपायला आलाय. मार्च महिन्यात शाळांच्या सुट्ट्यांपासून बॅकेच्या अनेक नियमात बदल होतो. प्रत्येक महिन्यात बॅंकांना सुट्टी असते. दरम्यान 1 मार्चला बॅंकांना सुट्ट्या असणार की नाही? संपूर्ण मार्च महिन्यात किती सुट्ट्या असणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक राज्यांची सुट्टी ही त्या राज्यातील सणांनुसार वेगळी असते. त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या वेबसाइटवर गेलात तर तुमच्या राज्यात कोणती सुट्टी आहे, अथवा नाही? हे तुमच्या लक्षात येईल. मार्च महिन्यात एकूण 14 दिवस बॅंक बंद राहणार आहेत. यामध्ये 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 7 दिवस बॅंकांचे कामकाज बंद राहीलं. 14 मार्चला होळी आणि 31 मार्चला ईद उल फितरसारखे 2 मोठे सण आहेत.यादिवशी बॅंका बंद राहतील. 

मार्च महिन्यातील सुट्ट्यांचा तपशील 

2 मार्च रोजी रविवारची सुट्टी, 7 मार्चला शुक्रवारी चापचर कुट महोत्सव (ऐझॉल), 8 मार्चला शुक्रवारी चापचर कुट महोत्सव (ऐझॉल), 9 मार्चला शनिवारी दुसरा शनिवार असल्याने सुट्टी असेल. १३ मार्चला गुरुवारी होलिका दहनची सुट्टी डेहराडून, कानपूर, लखनऊ, रांची, तिरुवंगपुरम येथे असेल. तर शुक्रवार 14 मार्च रोजी होळीची सुट्टी असेल. 15 मार्च शनिवारी याओसेंग दिवसअगरतळा, भुवनेश्वर, इंफाळ, पटना येथे साजरा केला जाईल. तर 16 मार्चला रविवारची सुट्टी असेल. 22 मार्च चौथा शनिवारची सुट्टी असेल. आणि हा बिहार दिवस असल्याने बिहारमध्ये विशेष सुट्टी असेल. 23 मार्चला रविवारची सुट्टी, 27 मार्चला गुरुवारी जम्मू, श्रीनगर येथे  शब-ए-कद्रची सुट्टी असेल. 28 मार्चला शुक्रवारी जमात जम्मू, श्रीनगर उल विदाची सुट्टी असेल. 30 मार्चला रविवारची सुट्टी असेल. 

31 मार्चची सुट्टी रद्द

यावेळी आरबीआयने 31 मार्च हा दिवस बँक क्लोजिंगचा दिवस म्हणून घोषित केलाय. त्यामुळे या दिवशी बँका बंद राहणार नाहीत. असे असले तरी मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता सर्व राज्यांमध्ये ईदच्या दिवशी बँका सामान्यतः बंद असतात. असे असताना जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल. तर तुम्ही या सुट्ट्या वगळता बँकेत जाऊ शकता. मार्च महिन्यात तुमच्या राज्यात आणि शहरात बँका कधी बंद राहतील हे माहिती करुन घ्या.

मार्चमध्ये शालेय विद्यार्थ्यांची मजा! होळीपासून ईदपर्यंत केव्हा बंद असणार शाळा? जाणून घ्या

ऑनलाइन माध्यमातून करा व्यवहार

बॅंका बंद असल्या तरी तुम्ही तुमचे काम ऑनलाइन बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता. बँका बंद असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशाचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे करू शकता. बँक सुट्ट्यांमुळे या सुविधांवर परिणाम होणार नाही.

1 मार्चला सुट्टी?

1 मार्चला रविवार नाहीय किंवा कोणता सणही नाहीय. त्यादिवशी शनिवार आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी बॅंक सुरु असते. त्यामुळे 1 मार्च 2025 रोजी बॅंक खुल्या राहतील. या दिवशी बॅंकांमध्ये नेहमीचे काम सुरु राहीलं. 

मार्चमध्ये शेअर बाजार किती दिवस बंद?

मार्चमध्ये 12 दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. मार्च 2025 मध्ये 12 दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शनिवार आणि रविवारी 10 दिवस ट्रेडींग होणार नाही. तसेच 14 मार्च रोजी होळी आणि 31 मार्च रोजी ईद-उल-फित्रच्या दिवशी शेअर बाजार बंद राहील.