Shah Rukh Khan Mahesh Manjrekar : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान हा काही दिवसांपासून मन्नत सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार या बातमीमुळे चर्चेत होता. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण हे काही दुसरंच आहे. लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितलं की शाहरुखसाठी त्यांच्याकडे एक खास स्क्रिप्ट आहे. याविषयी महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
शाहरुख खान यांनी नुकतीच 'पिंकव्हिला'ला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, एक अभिनेता आहे, ज्याला एक अभिनेता म्हणून खूप कमी लेखण्यात येतं पण मला तो सगळ्यात उत्तम वाटतो आणि तो म्हणजे शाहरुख खान. एक अभिनेता म्हणून, तो अप्रतिम काम करतो. कॅमेऱ्यासमोर तो सहजतेनं सगळं करून जातो.
पुढे जेव्हा त्यांना शाहरुख खानसोबत चित्रपट करण्यावर विचारण्यात आलं. तेव्हा महेश मांजरेकर त्यांच्याकडे शाहरुखसाठी योग्य एक स्क्रिप्ट आहे. महेश मांजरेकर म्हणाले, माझ्याकडे एक उत्तम चित्रपट आहे ज्यात माझी इच्छा आहे की त्यानं त्यात महत्त्वाची भूमिका साकारावी. अगदी साधारण चित्रपट आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. अर्थशास्त्रात पदवी घेतलेला आणि त्यानंतर इथे आलेला. त्यामुळे तो नेहमीच व्यवस्थित कपडे परिधान करून असतो. त्याशिवाय त्याचे रीमलेस चष्मे. आजच्या काळात तो सर्वोत्त्म आहे असं त्याला वाटतं. त्याचं कारण म्हणजे तो नियमितपणे सगळ्या गोष्टींचं तो योग्य पद्धतीनं नियोजन करतो. महत्त्वाचं म्हणजे जी सगळ्यात चांगली सवय आणि नियम आहे.
हेही वाचा : विवाहीत महिलांसोबत डबल डेट आणि पत्नीची फसवणूक... हँडसम अभिनेत्यानं जाहीरपणे केलं मान्य
शाहरुख खानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित किंग या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान देखील दिसणार आहे. तर याच चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन ही खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येण्याचं कारण तो मन्नतसोडून जवळपास 2 वर्षांसाठी दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे मन्नतमध्ये रेनोव्हेशनचं काम सुरु होणार आहे.