सेनेचं नेतृत्व वाट लावणारं नाही, तर वाट दाखवणारं - कोल्हे
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी बोलतांना डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण भगव्या कायम मान राखू असं म्हटलंय.
Mar 19, 2014, 11:48 AM ISTमनसेला धक्का; अमोल कोल्हे शिवसेनेत दाखल
मनसेची उमेदवारी धुडकावून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे सेनेत दाखल झालात. त्यामुळे राज ठाकरेंना जोरदार धक्का दिलाय. म्हणून, उद्धव ठाकरेंनाही राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्त दिल्याचं समाधान मिळालंय, असं म्हणायला हरकत नाही.
Mar 19, 2014, 11:39 AM ISTशिवसेनेचे कार्यकर्ते मनसेत, राऊतांची सडकून टीका
मुंबईतल्या अणुशक्तीनगरमधले शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजाराम मंगेला यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर त्यांनी मनसेत प्रवेश केला.
Mar 18, 2014, 04:33 PM ISTराज यांना महाराष्ट्राची वाट लावायचेय - उद्धव ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे. पूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे नाव वापरायचे. आता ते नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालत आहे. त्यांना त:च्या चेहऱ्यावर मतं मिळत नाही, म्हणून राज यांनी हा घाट घातला आहे, असा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
Mar 15, 2014, 05:08 PM ISTमहायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव
`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.
Mar 13, 2014, 03:36 PM ISTभाजप तुपाशी, उद्धव - राज उपाशी : निरुपम
भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्यादरम्यान सध्या सुरु असलेल्या सत्तेच्या जोड-तोडीमध्ये आता काँग्रेसनंही तोंड खुपसलंय.
Mar 13, 2014, 12:28 PM ISTकमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.
Mar 13, 2014, 11:43 AM ISTशेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे
राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.
Mar 12, 2014, 07:15 PM ISTराज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.
Mar 12, 2014, 03:47 PM ISTउद्धव ठाकरेंची गडकरी आणि मनसेवर टीका
महाराष्ट्रात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. शिवसेना-भाजप युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना बिब्बा टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं नाव न घेता टीका केलीय.
Mar 11, 2014, 04:49 PM ISTशिवसेनेची समजूत काढण्यासाठी भाजपची धावाधाव
भाजप आणि मनसेतल्या वाढत्या जवळीकीमुळं नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपची धावाधाव सुरू झालीयं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहेत.
Mar 11, 2014, 12:56 PM ISTलतादीदी आणि सचिननं घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन साजरा होतोय आणि आजच दोन दिग्गज वक्तिमत्त्वांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.
Mar 9, 2014, 06:06 PM ISTमनसेचा मोदींना पाठिंबा, सेनेविरुद्ध रणशिंग
आठव्या वर्धापन दिनानिमित्त `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं शिवसेनेविरोधातच रणशींग फुंकल्याचं दिसून आलंय. या कार्यक्रमात आपल्या भाषणात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा जाहीर केलाय.
Mar 9, 2014, 01:54 PM IST... असं आहे `एमएनएस अधिकृत अॅप`
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं आपलं `मोबाईल अॅप` जनतेसमोर आणलंय.
Mar 9, 2014, 01:27 PM ISTनिवडणूक लढवणारच, `मनसे`ची पहिली यादी जाहीर
मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या पहिल्या सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत...
Mar 9, 2014, 01:12 PM IST