Jasprit Bumrah Net Worth: पैसा ही पैसा... आलिशान घरांपासून महागड्या गाड्यांपर्यंत; बुमराहची नेट वर्थ माहितेय?

Jasprit Bumrah Net Worth 2025: जसप्रीत बुमराह नेट वर्थ 2025 टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी 2024 हे वर्ष उत्तम होते.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 12, 2025, 10:18 AM IST
Jasprit Bumrah Net Worth: पैसा ही पैसा... आलिशान घरांपासून महागड्या गाड्यांपर्यंत; बुमराहची नेट वर्थ माहितेय? title=

Jasprit Bumrah Net Worth 2025: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह काही काळापासून उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या करियर मध्ये त्याने वरचा ग्राफ पकडला आहे. जसप्रीत बुमराहसाठी 2024 हे वर्ष अतिशय विलक्षण होते. पाठच्या वर्षी त्याला ICC पुरूष सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर आणि ICC क्रिकेटर ऑफ द इयर या दोन मनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षाची अर्थात 2025 वर्षाची सुरुवात देखील बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 32 विकेट्स घेऊन जसप्रीतने केली.

बुमराहची हेल्थ 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 या मालिकेदरम्यान, बुमराह पाचव्या कसोटीदरम्यान जखमी झाला. त्याला पाठीची समस्या झाली.  यामुळे तो इंग्लंडविरुद्धची मालिका खेळू शकला नाही आणि आता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही माघार घेऊन बाहेर पडावे लागले. त्यावेळी बुमराहच्या जागी हर्षित राणाने संघात प्रवेश केला आहे. या दमदार खेळाडूबद्दल अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात असतात. त्यातलाच एक म्हणजे जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती किती आहे? चला आज आपण याबद्दल जाणून घेऊयात. 

हे ही वाचा: "इतके षटकार कोण मारतं भाऊ...?" 'या' भारतीय क्रिकेटपटूने ख्रिस गेलला टाकले मागे, यादीत 'हा' पाकिस्तानी खेळाडू अव्वल

 

जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती किती? 

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती ६०-६२ कोटी रुपये आहे. बीसीसीआयसोबतचे करार, मॅच फी, विविध माध्यमातील जाहिराती आणि आयपीएल हे बुमराहचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. बीसीसीआय (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बुमराहचा A+ ग्रेडमध्ये समावेश आहे. त्याला  वर्षाला सात कोटी रुपये मिळतात. प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपये, प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी 7 लाख रुपये आणि प्रत्येक टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये असे त्याचे शुल्क आहे.

हे ही वाचा: वय तीन वर्षे, उंची साडेसहा फूट, नाव किंग काँग... थायलंडची म्हैस होतेय व्हायरल; कारण...

 

आयपीएल पगार- रु. 18 कोटी (प्रत्येक हंगामात)

  • टी20आय मॅच फी- 3 लाख रुपये
  • कसोटी सामन्याची फी- रु. 15 लाख
  • एकदिवसीय सामन्याची फी- 7 लाख रुपये
  • बीसीसीआय केंद्रीय करार- ए प्लस ग्रेड (7 कोटी रुपये)
  • आयपीएलची एकूण कमाई- 86.8 कोटी रुपये

बुमराह राहतो एका आलिशान घरात 

बुमराहचे मुंबई आणि अहमदाबादमध्येही घर आहे. त्यांच्या मुंबईच्या घराची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. तर अहमदाबादमधील घराची किंमत तीन  कोटी रुपये आहे.

हे ही वाचा: फक्त एक सामना खेळलेल्या खेळाडूची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एन्ट्री! बोर्डाने घेतला मोठा निर्णय

 

जसप्रीतला आहे कारची आवड 

बुमराहकडे वाहनांचे अप्रतिम कलेक्शन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये निसान स्पोर्ट्स कार आहे, जी 'गॉडझिला' म्हणून ओळखली जाते. याशिवाय मर्सिडीज मेबॅक एस560, वेलार एसयूव्ही या वाहनांचा समावेश आहे.