Tuljabhavani Temple : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराचा पाया आणि भूगर्भात स्थितीची तपासणी केली जाणार आहे. मदिाराच्या गाभाऱ्यातील कोणशिळा, सभा मंडपातील दगडी बीम, स्तंभ आणि कर्णशिळांना तडे गेल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. बातमी दाखवताच पुरातत्त्व विभाग खडबडून जागं झालंय. पुरातत्त्व विभाग मंदिराच्या पाया आणि भूगर्भातील स्थितीची तपासणी करणारेय. यासाठी विशेष निधीची तरतूद देखील करण्यात येणारेय, अशी माहिती पुरातत्त्व विभागानं दिली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या गर्भ गाभाऱ्याच्या कोण शेळीला कडे गेले आहेत. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा व मंदिराचं शिखराला धोका निर्माण झाला आहे. मंदिराचं स्ट्रक्चर ऑडिट करून तात्काळ दुरुस्ती करावी असं निवेदन पुजारी मंडळांने मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे यांना दिली आहे. या निवेदनावर 5000 नागरिक व पुजाऱ्यांच्या सह्या आहेत.
पुजारी मंडळाच्या वतीने आई तुळजाभवानीच्या मूर्ती रक्षणासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार हे 5000 सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच तुळजाभवानी मंदिराचा मूळ गर्भ गाभारा काढून त्या ठिकाणी प्रशस्त मोठा गाभारा निर्माण करावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरा च्या गर्भ गाभाऱ्याच्या शिळाना तडे जाण्याची घटना गंभीर आहे .याकडे गांभीर्याने बघा अशा सूचनाही पुजारी मंडळांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केले आहेत. झी 24 तासनं ही बातमी लावून धरली होती.
धाराशिव-तुळजाभवानी मंदिर संस्थानला शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी मंदिर संस्थांच्या पंधराशे एकर जमिनीवर 1350 कोटी रुपये गुंतवणूक करून 300 मेगावॅटचा सोलर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलीय, हा प्रकल्प उभा करण्यासाठी देशातील नामांकित 10 कंपन्यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.