अनेकांच्या स्वयंपाकघरात वापरण्यासाठीच नव्हे तर शोभेसाठी वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात. खास करुन घरात पाहूण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण अशी विविध प्रकारची भांडी खरेदी करत असतो. यामध्ये जवळपास प्रत्येकाच्या घरात चीनी मातीची भांडी दिसणे सामान्य बाब आहे. फक्त नियमित वापरासाठीच नव्हे तर आकर्षक दिसण्याच्या बाबतीत सुद्धा ही भांडी लोकांची पहिली पसंत ठरत आहेत.
परंतु, चिनी मातीच्या भांड्यांच्या बाबतीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे चिनी मातीची भांडी ही शाकाहारी असतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याबद्दल सांगायचे झाल्यास, काही चिनी मातीची भांडी बनवताना प्राण्यांचे प्रोडक्ट्स वापरले जातात आणि यामुळेच ही भांडी मांसाहारी असल्याचे मानले जाते. जर तुम्ही शाकाहारी असाल तर चिनी मातीच्या भांड्यांचा वापर तुम्ही विचारपूर्वक करायला हवा. जाणून घ्या, अशी भांडी वापरताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायला हवी?
'बोन चायना' एक खास प्रकारची पॉटरी आहे. वाजवी दरातील, सुंदर आणि टकाऊ असल्यामुळे लोक अगदी आवडीने या प्रकारची भांडी खरेदी करतात. मात्र, या प्रकारच्या पॉटरीमध्ये प्राण्यांच्या हाडांचा वापर केला जात असून शाकाहारी असलेल्यांनी ही भांडी खरेदी करणं टाळलं पाहिजे. खरंतर, बोन चायनाची भांडी बनवताना डुक्करांच्या हाडांचा वापर होत असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये जवळपास 50 हाडांची राख वापरुन ही भांडी तयार केली जातात. भांडी आकर्षक आणि मजबूत बनवण्यासाठी प्राण्यांच्या हाडांचा वापर केला जातो.
चिनी मातीची भांडी बनवताना ती चमकदार होण्यासाठी अनेकदा प्राण्यांची चामडी म्हणजेच लेदरचा वापर केला जातो. 'चमोइस' या विशिष्ट प्रकारच्या लेदरचा समावेश ही भांडी बनवताना केला जातो. या लेदरच्या वापरामुळे माती चमकदार होण्यास तसेच भांड्यांना चांगली फिनिशिंग मिळण्यास मदत होते. तसेच, सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यांच्या निर्मितीसाठी एका विशिष्ट प्रकारच्या किड्यामधून 'शेलैक' हे रेजिन काढले जाते.
बऱ्याच चिनी मातीच्या भांड्यांमध्ये प्राण्यांपासून बनलेल्या स्पंज आणि ब्रशचा वापर केला जातो. भांडी आकर्षक दिसण्यासाठी तसेच चांगल्या फिनिशिंगसाठी समुद्रातील स्पंजचा वापर केला जातो आणि हे स्पंज समुद्रातील प्राण्यांपासून मिळवले जाते. तसेच, ब्रशचा वापर करण्यासाठी प्राण्यांच्या फर म्हणजेच केसांचा वापर केला जातो. पारंपारिक पद्धतीने मातीच्या ग्लेजिंगसाठी बकऱ्याच्या केसांचा वापर केला जातो.
जर तुम्ही शाकाहारी असाल तर व्हेगन सिरॅमिक्सपासून बनणारी भांडी ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. व्हेगन सिरॅमिक्स म्हणजे अशा सिरॅमिक्स ज्यात हाडांची राख वापरली जात नाही. व्हेगन सिरॅमिक्ससुद्धा दिसण्यासाठी तिचे आकर्षक आणि चमकदार असते. जर तुम्ही ऑनलाईन भांडी खरेदी करत असाल तर व्हेगन सिरॅमिक्स सर्च करुन सहजरित्या या प्रकारची भांडी खरेदी करु शकता. तसेच, दुकानातून व्हेगन सिरॅमिक्सची भांडी खरेदी करताना प्रोडक्ट्सच्या पॅकिंगवरील माहिती तपासून योग्यरित्या भांड्यांची खरेदी करु शकता. व्हेगन सिरॅमिक्स हा प्राण्यांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य पर्याय ठरु शकतो.