पाटा- वरवंटा की मिक्सर ग्राइंडर? काय आहे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?

आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत वाटण किंवा चटणी बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आधीच्या काळात वाटण बारीक करण्यासाठी पाटा-वरवंट्याचा वापर केला जायचा. आरोग्याच्या दृष्टीने काय आहे फायदेशीर? पाहूयात. 

Updated: Feb 12, 2025, 03:55 PM IST
पाटा- वरवंटा की मिक्सर ग्राइंडर? काय आहे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?  title=

Mixer or Stone-Grind: आजच्या धावपळीच्या जीवनात जवळपास प्रत्येकजण आपलं काम पटकन उरकण्याच्या प्रयत्नात असतो. खास करुन, घरातील कामे आटपण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांचा वापर केला जातो. याच उपकरणांपैकी चटणी किंवा भाजीतील वाटण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मिक्सरचा वापर केला जात नाही, असं क्वचितच ऐकायला मिळतं. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आधीच्या काळी वाटण बारीक करण्यासाठी पाटा-वरवंट्याचा वापर केला जायचा. आपल्या घरातील आजी किंवा मोठी मंडळी नेहमी वाटण बारीक करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पाटा आणि वरवंट्याचे फायदे सांगत असल्याचे आपण ऐकतो. पण; पाटा-वरवंटा की मिक्सर? आरोग्यासाठी नेमके काय फायदेशीर आहे? जाणून घेऊया. 

पाटा-वरवंटा की मिक्सर?

मिक्सर ग्राइंडरचा वापर करुन चटणी किंवा वाटण बारीक करणे हे अधिक सोयीचे आणि सोपे आहे. मिक्सरमध्ये वाटण बारीक केल्याने वेळेची बचत होते. तसेच, पाट्यावर बारीक केलेले वाटण हे जास्त चविष्ट असल्याचे सांगितले जाते. मात्र, याचा अर्थ मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण हे चिविष्ट नसते असा नाही. मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटणसुद्धा तितकेच चविष्ट लागते. 

मसाल्यांमधील उष्णता

खरंतर, खलबत्त्याची विशेष गोष्ट म्हणजे पाट्यावर वरवंट्याने वाटलेल्या मसाल्यांमधून उष्णता निर्माण होत नाही. त्यामुळे मसाल्यांची उष्णता कमी होते. मसालेदार चटणी किंवा वाटण मिक्सरमध्ये बारीक केल्याने मिक्सरच्या जारमध्ये उष्णता वाढते त्यामुळे मसाले गरम होतात आणि म्हणून चटणीची चवही बदलते.

भूक वाढवते

अनेकदा आपल्याला खूप कमी भूक लागते. मात्र, पाट्यावर वाटलेले मसाले आणि चटणी खाल्ल्याने भूक न लागण्याची ही समस्या दूर होण्यास मदत होते. कारण, पाट्यावर वाटलेल्या मसाल्याचा किंवा चटणीचा सुगंध बराच काळ टिकतो. पाट्यावर वाटलेल्या वाटणाचा हा सुगंध भूक वाढण्याला कारणीभूत ठरु शकतो. 

हातांचा व्यायाम

पाट्यावर वरंवट्याच्या सहाय्याने वाटण किंवा चटणी वाटल्याने हातांचा व्यायामदेखील होतो. त्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने पाटा-वरवंट्याचा वापर हा अधिक फायदेशीर ठरतो.

हे ही वाचा: जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान

 

 

वेळेची बचत

आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत पाट्यावर वाटण बारीक करणे हे सोपी गोष्ट नाही. आजकाल, महिला या फक्त घरातीलच नाही तर ऑफिसचंसुद्धा काम सांभाळतात. त्यामुळे पाट्यावर वरवंटा वापरुन वाटण किंवा चटणी बारीक करण्याइतपत त्या वेळ देऊ शकत नाहीत. जर तुमच्याकडे जेवण करताना पुरेसा वेळ असेल तर नक्की पाट्यावर बारीक केलेल्या चटणीचा आस्वाद घ्या आणि जर तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल तर वाटण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर करा. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)