अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर सणसणीत टीका
निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध मनसे यांचा वाद रंगतोय. या वादात आता शिवसेनेत नव्यानेच प्रवेश केलेल्या अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने उडी घेतली आहे.
Apr 8, 2014, 03:13 PM ISTवादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
Apr 8, 2014, 02:42 PM IST`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान
वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Apr 7, 2014, 10:34 PM ISTराज ठाकरे काँग्रेसचा भालू – रामदास आठवले
रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केलाय.. राज यांनी केलेल्या महाराष्ट्राचा लालू या टीकेवर मी त्यांना काँग्रेसचा भालू म्हणणार नाही असा उपरोधिक टोला आठवलेंनी लगावलाय.. तसंच राज ठाकरेंना महायुतीत नको असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय..
Apr 7, 2014, 08:36 PM ISTराजकारणातील `वडे`, `चिकन सूप` पुन्हा गरम
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सूपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू काँग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
Apr 6, 2014, 02:18 PM IST`हातासहीत, हातावरचं घड्याळही काढावं लागेल`
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी आज एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या. दोन्हीही सभेत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या विकासावर स्तुतीसुमनं उधळली.
Apr 5, 2014, 09:48 PM ISTराजना टोला, लायकी नसताना `सुपा`एवढे दिले - शिवसेना
बाळासाहेब लाखोंचे पोशिंदे होते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या पोटाची भाषा केली. ज्यांना लायकी नसताना `सुपा`एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपाचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय?, असा खरमरीत अग्रलेख `सामना` या शिवसेनेच्या मुखमत्रात लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार चिमटा काढला आहे.
Apr 5, 2014, 12:56 PM ISTशहाणपण... ठाकरे बंधुंनी एकमेकांवर टीका करणं टाळलं!
शुक्रवारी महायुतीची बुलडाणा तर मनसेची नवी मुंबईत प्रचार सभा झाली. यावेळी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर पलटवार करणार असं वाटत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र `राज` हा विषयच सपशेल बाजुला सारला...
Apr 4, 2014, 09:25 PM ISTउद्धव ठाकरे - बाळासाहेबानंतर दुसरा वाघ
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेची लोकसभा पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली आहे.
Apr 4, 2014, 06:49 PM ISTमुंबई राड्यानंतर राज ठाकरेंचे मौन, मांजरेकर यांची कॉमेडी
शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात दक्षिण मुंबईत झालेल्या राड्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मौन बाळगणं पसंत केलं. गोरेगावमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा असतानाही, या राड्याबाबत त्यांनी चकार शब्द उच्चारला नाही.
Apr 4, 2014, 12:41 PM ISTठाकरे बंधुंचं वाकयुद्ध राड्यातून रस्त्यावर!
शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्यात कुटुंब कलह सुरू झालाय तर त्यांचा झेंडा खांद्यावर घेणारे शिवसैनिक आणि मनसैनिक एकमेकांना भिडलेत. आपापल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, रस्त्यावर तुफानी राडा करतायत.
Apr 3, 2014, 08:20 PM ISTठाकरे बंधूंमध्ये कटुता आणि गांधी बंधूंमध्ये गोडवा का वाढतोय?
गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. तर ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज यांच्यात मात्र जोरदार `भाऊबंदकी` रंगलीय. चुलतबंधूंमध्ये सुरू असलेल्या महाभारताचा लेटेस्ट एपिसोड.
Apr 3, 2014, 08:54 AM ISTमनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Apr 3, 2014, 08:40 AM ISTराज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
`उद्धव हॉस्पीटलमध्ये असताना अलिबागचा दौरा अर्ध्यावर सोडून हॉस्पीटलमध्ये दाखल झालो होतो... घरी जाताना गाडीत त्याच्या शेजारीच बसून होतो... बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला हे तेव्हा नाही आठवलं`
Apr 2, 2014, 08:43 PM ISTशरद पवारांनी फेसबुकवर केलं राज ठाकरेंचं कौतुक
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलंय. त्यांच्या फेसबुक पेजवर पवारांनी त्यांचं मत नोंदवलंय. राज यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष निर्माण केला आणि तो वाढवला, असं पवार यांनी म्हटलंय.
Apr 1, 2014, 11:36 PM IST