लोकसभा निवडणूक : `मनसे`चे संभाव्य उमेदवार
लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि इतर पक्षांचीही उत्सुकता आता प्रचंड ताणली गेलीय.
Mar 9, 2014, 10:39 AM ISTमनसेचा आठवा वर्धापनदिन सोहळा...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज साजरा होतोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
Mar 9, 2014, 10:24 AM ISTमनसे लोकसभा निवडणूक लढवणार ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ९ मार्चला जाहीर होणार आहे.
Mar 7, 2014, 08:09 PM ISTपुण्यातील तीन बड्या नेत्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय. जिल्हयातील शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. माजी जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे, उपजिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, शरद सोनावणे यांनी सेनेला रामराम ठोकलाय.
Mar 7, 2014, 06:15 PM ISTराज ठाकरे-भाजप जवळीक घट्ट, शेलार-तावडे भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक अधिकच वाढ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. आज राज यांची भेट घेण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि नेते विनोद तावडे कृष्णकुंजवर पोहोचले. त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे
Mar 7, 2014, 02:39 PM ISTमनसेचे बदलते रंग...नक्की काय केले?
राज्यात तिसरी आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. निमित्त होते शेकापचे नेते जयंत पाटील आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचे. त्यामुळे मनसे कात टाकते आहे का, याची चर्चा सुरू झाली. मनसेचे बदलते रंग, अशीच काहीशी अवस्था दिसून येत आहे.
Mar 7, 2014, 09:52 AM ISTराज ठाकरे रविवारी बोलणार?
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेय. राज यांच्यावर टीका होत आहे. तर शिवसेनेने गडकरी यांना टार्गेट केलेय. मुंडे म्हणत आहेत, सहावा भिडू नको, असा सूर लावत आहेत. त्यामुळे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत उतरणार की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
Mar 6, 2014, 02:21 PM ISTमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना `टोल`वलं...
राज्याचं नव टोल धोरण लवकरच आणू, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं खरं... पण, पाळलं मात्र नाही...
Mar 5, 2014, 08:47 PM ISTमनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेलीय - मुंडे
`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Mar 5, 2014, 04:35 PM ISTराज-गडकरी स्वस्त व मस्त सौदा - शिवसेना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीवरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींवर टीका केलीय.
Mar 5, 2014, 09:49 AM ISTराज भेटीने भाजपचे परप्रांतीय मारहाणीला समर्थन - आर आर पाटील
भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीवर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी टीका केली आहे. मनसेसोबत हातमिळवणी करणा-या भाजपचे परप्रांतीय मारहाणीला समर्थन आहे का? असा सवाल केलाय.
Mar 5, 2014, 08:38 AM ISTराज ठाकरे मराठी माणसासाठी निर्णय घेतील - बाळा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणालाही भेटायला बोलावलेलं नसल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय... महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे लवकरच घेतील असंही त्यांनी सांगितलंय...
Mar 4, 2014, 08:18 PM ISTगडकरींचा प्रस्ताव राज ठाकरेंना अमान्य
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिलेला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमान्य केलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं आता मनसे आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2014, 08:06 PM ISTमहायुतीत मनसेची गरज नाही - संजय राऊत
शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, महायुतीमध्ये मनसेची कोणतीही गरज नाही.
Mar 4, 2014, 05:30 PM ISTराज-गडकरी भेटीवर उद्धव कमालीचे अस्वस्थ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ झालेत.
Mar 3, 2014, 07:44 PM IST