मुख्यमंत्री

महावितरण घोटाळ्याला अजितदादांचं संरक्षण, भाजपचा आरोप

महावितरण आणि महाजनकोने ६० हजार कोटींचा घोटाळा असून, या घोटाळ्याला उर्जामंत्री अजित पवार यांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. सांगलीत भंडारी हे प्रसारमाध्यामांशी बोलत होते.

Oct 6, 2013, 08:07 PM IST

क्लस्टर डेव्हलपमेंट- राष्ट्रवादीच्या नेत्यांचं उपोषण मागे

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरुन ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागं घेतलंय. मागील दोन दिवसांपासून ते उपोषणावर होते.

Oct 6, 2013, 07:05 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचं उपोषण साधणार काय?

ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा शिगेला

राजकीय पक्षांची स्टंटबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं उपोषण, नगरसेवकही बसले उपोषणाला

काही ठिकाणी फोडल्या बसगाड्या..

Oct 6, 2013, 02:07 PM IST

‘दहीहंडी’ हा खेळ नाही उत्सवच!

दहीहंडीचा खेळात समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र खेळाचा दर्जा मिळण्याची हंडी फोडण्याचे प्रयत्न लावण्याआधीच अपेक्षांचा मनोरा कोसळलाय. गेल्या आठवड्यातल्या मंत्रिगटाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही चर्चाच संपवून टाकली.

Sep 24, 2013, 11:08 AM IST

मुंडे, मुख्यमंत्र्यांचं `क्रिकेट`, की पवारांना `चेकमेट`?

पृथ्वीराज चव्हाण ज्या माझगाव क्रिकेट क्लबकडून मैदानात उतरले त्याच क्लबचे सेक्रेटरी शाहआलम हे स्टायलो क्रिकेट क्लबचेही मालक आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि गोपीनाथ मुंडे यांना क्रिकेटच्या मैदानात उतरवणारा समान दुवा एकच आहे.

Sep 17, 2013, 05:49 PM IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची गुगली, BCCI निवडणुकीबाबत मौन

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रिंगणात उतरले आहेत. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुख्यमंत्र्यांनी एमसीएमध्ये एंट्री घेतली आहे. मात्र, मी BCCIची निवडणूक लढणार की नाही, याबाबत बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय.

Sep 17, 2013, 09:32 AM IST

पवार-मुख्यमंत्र्यांची शब्दखेळी बिल्डरांशी संबंधीत?

शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सध्या सुरु असलेले आरोप - प्रत्यारोप हे पुण्या-मुंबईतल्या बिल्डरांशी संबधित असल्याची शंका भाजपनं व्यक्त केलीय.

Sep 13, 2013, 11:05 AM IST

मुख्यमंत्र्यावर शरद पवारांचा वार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केलीय. अलिकडच्या काळात प्रशासनातील लोकांचा हात सही करताना थरथरतो. त्यांना लकवा धरला की काय..? दोन-दोन महिने फायलींवर सह्या होत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून घरचा आहेर दिलाय

Sep 10, 2013, 08:38 PM IST

जनलोकपाल बिल : राज्यपालांचं मोदींना आव्हान!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गव्हर्नर कमला बेनीवाल हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात या दोघांमध्ये आता मतभेद उघड झाले आहेत.

Sep 3, 2013, 12:57 PM IST

मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?

मेट्रो रेल्वे एक सप्टेंबरपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. आता डिसेंबरपासून मेट्रो धावू लागेल, अशी शक्यता आहे.

Aug 31, 2013, 03:07 PM IST

महाराष्ट्र बँकेनं कमावला ४४१ कोटींचा नफा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना हटवून प्रशासक नेमलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नफ्यात आली आहे.

Aug 13, 2013, 10:18 AM IST

यूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात त्यांना दिवसाच्या सुरूवातीलाच कटू सत्याला सामोरे जावे लागले. एका शाळेतील मुलाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? असे विचारल्यावर ‘लखनऊ’ हे उत्तर न मिळता ‘दिल्ली’ हे उत्तर मिळाले.

Aug 9, 2013, 11:23 AM IST

मोदींनी बघितला स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आज विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या काही सहकाऱ्यांसह चित्रपट बघितला.

Aug 7, 2013, 10:34 AM IST

शिकाऱ्याला गोळ्या घाला, मुख्यमंत्र्यांचे आदेश

आता जो वाघाची शिकार करेल, त्याची खैर नाही... कारण वाघाची शिकार करणाऱ्याला ताबडतोब गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Jul 31, 2013, 09:46 AM IST

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?

विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.

Jul 29, 2013, 09:25 AM IST