IND VS PAK : 19 फेब्रुवारी पासून सुरु झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा आता रंगात आलीये. यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात स्पर्धेचा पाचवा सामना पार पडणार असून दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सर्व सामने हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला. हा टॉस पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाही. तर पाकिस्तानने देखील तीच प्लेईंग 11 ठेवली असून फक्त दुखापतग्रस्त फखर जमा ऐवजी इमाम-उल-हक याला संधी दिली आहे.
हेही वाचा : पाकिस्तानच्या कोचचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज! भारत Vs पाक सामन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याने उडाली खळबळ
कर्णधार रोहित शर्मा याने टॉस झाल्यावर म्हटले की, 'त्यांनी नाणेफेक जिंकल्याने काही फरक पडत नाही, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आमच्याकडे फलंदाजीत अनुभवी युनिट आहे त्यामुळे खेळपट्ट्या कमी झाल्यास काय करावे लागेल हे आम्हाला माहीत आहे. एकंदरीत संपूर्ण संघाकडून आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे'.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद