मुख्यमंत्री

'एमपीएससी परीक्षा वेळेतच घेणार....'

एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलाय. याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

Apr 3, 2013, 04:02 PM IST

मुख्यमंत्र्यांचा मनसेला दे धक्का!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त एल ई डी लाईट बसवण्याच्या नाशिक महापालिकेच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीय. याविषयी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती.

Mar 14, 2013, 09:15 PM IST

`अजितदादांनीच व्हावं मुख्यमंत्री!`

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवलाय.

Mar 11, 2013, 06:51 PM IST

३१ मार्चपर्यंतच मिळणार `आधारकार्ड`

अजून ज्या लोकांनी ‘आधार क्रमांक’ घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डासाठी अर्ज भरावेत, असे आदेशच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलेत.

Feb 23, 2013, 11:04 AM IST

मालमत्ता उघड करण्यास मंत्र्यांची टाळाटाळ...

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची वार्षिक मालमत्ता जाहीर करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, बहुतांश मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी त्याला केराची टोपली दाखवलीय.

Feb 23, 2013, 09:45 AM IST

जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.

Feb 13, 2013, 09:19 PM IST

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही; मुख्यमंत्री नाराज

शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय.

Dec 10, 2012, 09:09 AM IST

बाळासाहेब नसते तर नारायण कुठेच नसता- राणे

`साहेब नसते तर नारायण कुठेच नसता`, शिवसेनेत असेपर्यंत त्यांच्या प्रत्येक सभा ऐकल्या, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री झालो होतो असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

Nov 26, 2012, 05:32 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचा भंग!

औरंगाबदमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचा भंग झाल्याची घटना घडली आहे. विद्यापीठाची परीक्षा सुरू असतांना या सरस्वती भुवन कॉलेजच्या पटांगणात १२ बलुतेदार संघटनेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

Oct 13, 2012, 08:35 PM IST

उद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं

Oct 7, 2012, 08:29 PM IST

जलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!

सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा विभागातल्या 45 अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विरोधी पक्ष मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम आहेत. सिंचन प्रकल्पांच्या किंमती वाढण्यामागे नियम डावलले गेल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केलीये.

Oct 7, 2012, 08:05 PM IST

श्वेतपत्रिकेवरून शरद पवारांची मुख्यमंत्र्याशी चर्चा

सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखी एक दणका दिलाय. जलसंपदा खात्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची माहिती पहिल्यांदा समोर आणणाऱ्या वडनेरे समितीच्या शिफारशीनुसार ही चौकशी होणार आहे.

Oct 6, 2012, 11:01 PM IST

दादा-बाबांच्यामध्ये दरी, फोन घेण्यास टाळाटाळ

अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.

Sep 26, 2012, 01:11 PM IST

पवार आणि मुख्यमंत्री भेटणार चिदम्बरम यांना

सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अर्थमंत्री पी चिंदंबरम यांना भेटणार आहेत.

Sep 24, 2012, 04:20 PM IST

राज ठाकरे पुन्हा आक्रमक, सीएमच्या भेटीला

टोलवसुलीला तीव्र विरोध करत राज्यात आंदोलनाची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Aug 10, 2012, 04:40 PM IST