Champion Trophy 2025, India vs Pakistan: आज 23 फेब्रुवारी 2025 कट्टर प्रतिस्पर्धक असेलेले भारत पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान विराट कोहली 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात मोठा विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान विरुद्ध हा सामना जिंकणे एवढं लक्ष्य घेऊन भारत मैदानात उतरणार नाहीये तर याच्या विजयासह
भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतो आणि पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो.
विराट कोहलीने स्पर्धेची सुरुवात एवढी खास झाली नाही. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ 22 धावा केल्या, ज्यात 38 चेंडूत केवळ एक चौकार त्याने लगावला. त्याचा स्ट्राईक रेट फक्त 57.89 होता. मात्र, विराटची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी नेहमीच त्याच्या नावाप्रमाणे विराट राहिली असून, हा सामना त्याच्यासाठी खास ठरू शकतो. हा सामना त्याचा २९९ वा एकदिवसीय सामना असेल.
हे ही वाचा: आजच्या सामन्याचे सर्व अपडेट्स एकाच क्लिकवर 'इथे' पाहा
विराट कोहलीला 14,000 वनडे धावांचा टप्पा पार करण्यासाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फक्त 15 धावा करण्याची गरज आहे. जर विराटने आज 15 धावा केल्या तर 14,000 वनडे धावांचा हा टप्पा गाठणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. तसेच 300 पेक्षा कमी डावात ही कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनाच 14,000 वनडे धावा करता आल्या आहेत.
हे ही वाचा: भारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी
हे ही वाचा: India vs Pakistan: पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे 'या' भारतीय खेळाडूची मोठी चाहती
विराट कोहलीने आतापर्यंत 286 एकदिवसीय डावांमध्ये 13,985 धावा केल्या आहेत, ज्यात 50 शतके आणि 73 अर्धशतक यांचा समावेश आहे. त्याची सरासरी 57.78 आहे. 2023 च्या विश्वचषकात कोहलीने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रमही मागे टाकला होता.