India Tour Sri lanka | खेळावर लक्ष द्या, सेलिब्रेशन करणारी टीम इंडिया क्रीडारसिकांकडून ट्रोल

खेळाडू धम्माल करतानाचा फोटो बीसीसीआयनं ट्विट करत शेअरही केला 

Updated: Jul 2, 2021, 04:01 PM IST
India Tour Sri lanka |  खेळावर लक्ष द्या, सेलिब्रेशन करणारी टीम इंडिया क्रीडारसिकांकडून ट्रोल title=
छाया सौजन्य- सौशल मीडिया

नवी दिल्ली : (India Tour Sri lanka) भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांदरम्यान, 13 जुलैपासून तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर असणारा भारतीय संघ, टी20 मालिकाही खेळणार आहे. यादरम्यान, शिखर धवन याच्या खांद्यांवर संघाच्या कर्णधारपदाची धुरा असेल. संघाची कामगिरी येत्या काळात कशी असेल हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच, पण त्यापूर्वी मात्र संघातील खेळाडूंवर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

मोठ्या प्रमाणात संघाची खिल्लीही उडवण्यात येत आहे. श्रीलंकेच्या संघाविरोधात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका खेळण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू काही निवांत क्षण व्यतीत करत आहेत. स्विमिंग पूलमध्ये खेळाडू धम्माल करतानाचा फोटो बीसीसीआयनं ट्विट करत शेअरही केला आहे. 

झहीरच्या Wedding Party मध्ये विराटनं अनुष्कासोबत असं काही केलं की.... 

शिखर धवन, युजवेंद्र चहल यांसारखे खेळाडू या फोटोमध्ये दिसत आहेत. पण, नेटकऱ्यांना मात्र हा फोटो फारसा रुचलेला नाही हेच स्पष्ट होत आहे. खेळावर लक्ष द्या नाहीतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ज्याप्रमाणे विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा दारुण पराभव झाला, त्याचप्रमाणे भारताच्या एकदिवसीय संघालाही पराभवाचा सामना करावा लागेल अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देण्यात सुरुवात केली. 

संघातील खेळाडूंनी मजामस्ती करण्याला प्राधान्य देण्याऐवजी खेळावर लक्ष देत मैदान गाजवण्यावरच लक्ष द्यावं यासाठी फॉलोअर्स आग्रही दिसले. तेव्हा आता फॉलोअर्सची ही सल्लावजा मागणी खेळाडू पूर्ण करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.