डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तर माहिती असतात; पण, हे दुष्परिणाम एकदा वाचाच

चॉकलेटचं नाव ऐकताच लहान मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींच्याही तोंडाला पाणी सुटतं. आरोग्याच्या दृष्टीने योग्य म्हणून आपण  इतर चॉकलेट टाळतो आणि डार्क चॉकलेट खातो. मात्र, हल्ली आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही जाणून घ्या. 

Updated: Feb 8, 2025, 06:06 PM IST
डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे तर माहिती असतात; पण, हे दुष्परिणाम एकदा वाचाच title=

Chocolate Day 2025: चॉकलेट हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे. चॉकलेट डे (9 फेब्रुवारी) हा दिवस तर खास चॉकलेट प्रेमींसाठीच असतो. बरेच लोक डार्क चॉकलेटला आरोग्यासाठी फायदेशीर मानतात, पण यासोबत अनेक गैरसमजही पसरले आहेत. अशेच काही गैरसमज तुम्हाला देखील असतील तर दुर करुन घ्या.

डार्क चॉकलेट कोकोआ मास, कोकोआ बटर आणि साखर यापासून तयार केली जाते. यात कोकोआचे प्रमाण जास्त (70 ते 90 टक्के) असते, त्यामुळे ती मिल्क चॉकलेटपेक्षा वेगळी असते. कोकोआमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवोनॉइड्स आणि मिनरल्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

डार्क चॉकलेट वजन कमी करण्यात मदतरुप 

ही एक मोठी चुकीची समजूत आहे. डार्क चॉकलेटमध्येही साखर आणि चरबी असते, त्यामुळे ती वजन वाढवू शकते. मात्र, योग्य प्रमाणात खाल्ल्यास ती भूक नियंत्रित करण्यात मदत करू शकते.

डार्क चॉकलेट हृदयासाठी चांगली असते

डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स रक्तदाब आणि रक्तप्रवाह सुधारू शकतात, त्यामुळे ती हृदयासाठी चांगली मानली जाते. पण यात साखर आणि चरबीही असते, त्यामुळे प्रमाणातच खाणे योग्य.

डार्क चॉकलेट मूड सुधारते

हे खरे आहे! कोकोआमधील घटक सेरोटोनिन आणि एंडोर्फिन हार्मोनला सक्रिय करतात, जे मन प्रसन्न ठेवतात. तसेच, यामध्ये असलेले मॅग्नेशियम तणाव कमी करू शकते. मात्र, यावर पूर्ण अवलंबून राहू नये.

डार्क चॉकलेटमध्ये साखर नसते

ही मोठी चूक आहे. मिल्क चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये कमी साखर असते, पण ती पूर्णपणे साखरमुक्त नसते. त्यामुळे खरेदी करताना लेबल नक्की तपासा मधुमेहाची समस्या असल्यास साखरेच प्रमाण किती आहे हे जाणून घ्या.

हे ही वाचा:  फ्रीज खराब होऊ नये असे वाटत असेल तर 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या! राहील कार्यक्षमता टिकवून

डार्क चॉकलेट डायबेटीसचा धोका कमी करते

फ्लेवोनॉइड्समुळे इंसुलिनची कार्यक्षमता सुधारू शकते, पण त्यातील साखर आणि कॅलरींची मात्रा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. डायबेटीस असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच डार्क चॉकलेट खावे.

डार्क चॉकलेटचे काही फायदे आहेत, तसेच काही दुष्परिणामदेखील आहेत. म्हणूनच ते प्रमाणात खाणे योग्य.

टीप: डार्क चॉकलेटचे सेवन दररोज करु नका. पण, काही सणसमारंभात किंवा आठवड्यातून एखाद्या दिवशी तुम्ही या चॉकलेटचा आनंद घेऊ शकता.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)