Shehbaz Sharif on IND vs PAK Champions Trophy: बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेच्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आयसीसी (ICC) स्पर्धेत बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. चाहत्यांपासून ते खेळाडूंपर्यंत दोन्ही देशांचे दिग्गज क्रिकेटपटू या सामन्याबद्दल उत्सुक आहेत. एवढंच नाही तर जगभरात याची चर्चा होते. स्पर्धेचे यजमान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक विधान केले. त्यांचे हे वक्तव्य आता व्हायरल झालं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, त्यांच्या संघासाठी केवळ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणेच नव्हे तर २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताचा पराभव करणे हे खरे आव्हान असेल. नव्याने नूतनीकरण केलेल्या गद्दाफी स्टेडियमच्या उद्घाटन समारंभात शरीफ म्हणाले की, त्यांच्या खेळाडूंना भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. "आमचा संघ खूप चांगला आहे आणि अलीकडच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्यांच्यासमोर खरे आव्हान केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे नाही तर दुबईत होणाऱ्या सामन्यात आमच्या कट्टर प्रतिस्पर्धी भारताला पराभूत करण्याचे असेल. पाकिस्तान संघाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे."
हे ही वाचा: महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार जगातील सर्वात मोठा भूजल पुनर्भरण प्रकल्प, 73 गावांना होणार फायदा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा मोठा इतिहास आहे. भारतीय संघाने ९० च्या दशकापासून आयसीसी स्पर्धांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.कोणत्याही आयसीसी (ICC) स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानचा शेवटचा विजय 2021 मध्ये दुबईत झालेल्या T20 विश्वचषकात होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान गतविजेता म्हणून सहभागी होणार आहे. याआधी त्याने 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
हे ही वाचा: पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे 'हे' 7 क्रिकेटपटू नव्हते मुस्लिम, एकाने स्वीकारला होता इस्लाम धर्म
शहबाज शरीफ यांना त्यांच्या संघावर पूर्ण विश्वास आहे ते म्हणाले, "पाकिस्तानसाठी ही मोठी संधी आहे, कारण आम्ही जवळपास 29 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की आमचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही देशाचा गौरव करेल."
हे ही वाचा: `हा` भारतीय फलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर झाला नाही आऊट!
गद्दाफी स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम 117 दिवसांत पूर्ण झाले. प्रसिद्ध गायक अली जफर, आरिफ लोहार आणि आयमा बेग यांनीही उद्घाटन सोहळ्यात प्रेक्षकांचे मनोरंजन केले.